जन्मदात्या आईने सुनेची बाजू घेतल्यामुळे मुलाने उचलले टोकाचे पाऊल…

0

बस्ती : उत्तर प्रदेशमधील बस्तीमध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मुलाने आपल्या वृद्ध आईला बांबूने मारहाण केल्यामुळे आईचा मृत्यू झाला आहे.या हत्येमागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. काय आहे नेमके प्रकरण?आरोपी मुलाचे नाव बैजनाथ असे आहे तर मृत आईचे नाव कौशल्या असे आहे. आरोपी बैजनाथ याचं रोजच त्याच्या पत्नीसोबत भांडण व्हायचं. यादरम्यान तो अनेकवेळा पत्नीला मारहाणही करायचा. घटनेच्या दिवशीदेखील दोघां पती – पत्नींमध्ये जोरदार भांडण झाले. हे भांडण पाहून वर्षांची आई मध्ये पडली आणि तिने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

याचा बैजनाथला राग आल्याने त्याने समोरच असलेल्या बांबूने आपल्या जन्मदात्या आईवर हल्ला केला. या हल्ल्यात मुलाची आई गंभीर जखमी झाली. यानंतर गावकऱ्यांनी आईला रुग्णालयात नेले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.