भाजपचा आगामी निवडणुकीसाठी ‘मेगा प्लॅन’, पक्षात हालचालींना वेग

0
1

लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्ष उरले असतानाच ही निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘मेगा प्लॅन’ आखला असून, त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे तब्बल २२५ नेते देशभरात सभांचा धुरळा उडविणार आहेत. सर्व मतदारसंघातील सुमारे ८० कोटी लोकांपर्यंत पोचून मोदी सरकारच्या कामाचा गजर करण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. मोदी यांच्या करिष्यावर भाजप निवडणुकांना सामोरे जाणार असल्याने स्पष्ट आहे.

मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या काळातील काम लोकांपुढे मांडण्यासाठी भाजप नेते कामाला लागले आहेत. त्यातून पुढील निवडणुकांच्या प्रचारालाही सुरवात केली जात आहे. सरकारच्या कामांना लोकांपुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या अभियानाची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद तावडे यांनी दिली.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

तावडे म्हणाले, ‘‘या अभियानातून लोकांना समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी मोदी यांच्या १२ सभा होतील. त्याशिवाय पक्षातील २२७ वरिष्ठ नेते सभा घेऊन सरकारची कामगिरी मांडणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात हे अभियान होईल’’. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षबांधणी, नियुक्त्या आणि इतर गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात येत आहे.