‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांची भावुक पोस्ट चर्चेत

0
1

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शोपैकी एक शो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील विनोदवीर आपल्या अचूक कॉमिक अंदाजाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. खुद्द हास्यजत्रेतील विनोदवीरांनी याविषयी हिंट दिली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामधले कलाकार प्रियदर्शनी इंदलकर हिने महाराष्ट्राची हास्यजत्राचा सेटचा फोटो शेअर केला आणि लिहिले की,भेटूया २ महिन्यांनी, अशी प्रियदर्शनी इंदलकरने पोस्ट केलीय. अशाप्रकारे महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो २ महिन्यांचा ब्रेक घेणार आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार आता शेवटच्या भागांचे शूटिंग करत आहेत. हे शूटिंग करत असताना कलाकार खूप खूश आहेत. याशिवाय गौरव मोरेने सर्वांसोबत सेल्फी व्हिडिओ घेत आनेवाला पल, जानेवाला है असे गाणे वापरले आहे. शेवटचा दिवस, शेवटचे शूटिंग असे कॅप्शन देत कलाकार भावुक झाले आहेत.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

याशिवाय हास्यजत्रेतील कलाकार रसिका वेंगुर्लेकरने चाहत्यांना दिलासा दिलाय. काळजी करू नका guys..शो बंद होत नाहीये. आम्ही MHJ टीम छोटीशी सुट्टी घेतोय. आम्ही लवकरच भेटू. खूप लवकर अशी पोस्ट करत रसिक वेंगुर्लेकरने चाहत्यांना माहिती दिली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो बंद व्हायचे कारण म्हणजे सोनी मराठीवर लवकरच कोण होईल मराठी करोडपतीचा नवीन सीझन सुरू होतो आहे. पुन्हा एकदा अभिनेते सचिन खेडेकर KBC मराठीचा नवीन सिझन होस्ट करताना दिसणार आहेत. २९ मेपासून, सोम. ते शनि., रात्री ९ वाजता KBC मराठी सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे. अशाप्रकारे हास्यजत्रा २ महिन्याचा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला रुजू होईल.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय