काँग्रेस-ठाकरे जागावाटपावरून गटात मतभेद! राज्यातील ३ नेते हायकमांडला भेटणार

0
2

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या बैठका सुरू आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप असा सामना रंगणार आहे. मात्र, महाविकास आघाडीत जागावाटपावरुन गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप आघाडीत चर्चा झाली नाही. मात्र काँग्रेस पक्ष तयारीला लागला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “लवकरच हे प्रकरण निकाली काढले जाईल. २१ रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आहे, त्यात आम्ही आमचे ३ नेते पाठवू. सर्व जागा गुणवत्तेच्या आधारावर ठरवल्या जातील आणि समितीमध्ये चर्चा होईल. विजय वडेट्टीवार म्हणाले, शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकित प्राथमिक जागावाटपावर चर्चा झाली आहे. काँग्रेस हायकमांड जागावाटपावर पुढचे सुत्र ठरवेल. महाराष्ट्रात भाजपचे पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

महाविकास आघाडी होणार हे नक्की आहे. मात्र जागावाटप हायकमांड ठरवणार आहे. तीनही पक्ष ठरवतील. कोणीतरी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला महाविकास आघाडी होऊ नये, असे वाटते. जागावाटपाबाबच फॉर्म्युला अजून ठरला नाही मात्र २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा आम्हीच लढणार, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. यावर जागावाटपात निवडूण कोण येईल, हा विषय महत्वाचा असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.