K-pop इंडस्ट्रीला मोठा धक्का… आणखी एका प्रसिद्ध के पॉप सिंगरने 29 व्या वर्षी केली आत्महत्या

0

भारतात कोरियन संगीत प्रेमींची काही कमी नाही. भारतातही के पॉप ब्रण्ड हा खुपच प्रसिद्ध आहे. मात्र के पॉप प्रेमींसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलीआहे. प्रसिद्ध के-पॉप गायक हासूने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या केवळ 29 वर्षी तिनं हे टोकाचं पाउल उचललं आहे. अनेक कोरियन न्यूजनुसार, ती तिच्या हॉटेल रुममध्ये मृतावस्थेत आढळली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना एक सुसाइड नोट मिळाली आहे. हेसूच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जेओला बुक-डोच्या वांजू गनमधील ग्वांगजुम्यॉन पीपल्स डे कार्यक्रमासाठी ती 20 मे 2023 रोजी वांजू गन, जिओलाबुक-डो येथे ग्वांगजुमियोन पीपल्स डे कार्यक्रमात सादर करणार होती. मात्र, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचा फोन आयोजकांना आला. हसूच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

तिचा जन्म 1993 मध्ये झाला. तिने 2019 मध्ये माय लाइफ, मी ती या सोलो अल्बमने आपल्या करिअरची सुरुवात केली. गायो स्टेज, हँगआउट विथ यू आणि द ट्रॉट शोमध्ये परफॉर्म करून ती लोकप्रिय झाली. 13 मे रोजी गायिका तिच्या घरी मृतावस्थेत आढळली होती. गायकाच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. हाय सू तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधीपर्यंत सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संपर्कात होती.

तर हसूच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर तिचे चाहते हादरले असून सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. अनेक चाहत्यांनी ट्विट करून रेस्ट-इन-पीस लिहिले आहे. सोशल मिडियावर तिची चर्चा आहे. एप्रिल रोजी अॅस्ट्रो स्टार मून बिनने देखील अशाच प्रकारे आत्महत्या केली होती. त्याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. मून बिन यांचे वयाच्या 25 व्या वर्षी हे टोकाचं पाउल उचललं होतं.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

मून बिनच्या आकस्मिक मृत्यूनंतर सुमारे तीन आठवड्यांनंतर, आता के-पॉप गायक हसूने देखील त्याचप्रकारे आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणीही होत आहे.