कर्नाटक मुख्यमंत्र्याची २४ तासांत घोषणा; दोन्ही प्रबळ इच्छुक उमेदारांचे हल्ले प्रतीहल्ले सुरूच!

0

कर्नाटकातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (CLP) नेत्याची निवड करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. या तिन्ही पर्यवेक्षकांना रविवारी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांशी स्वतंत्रपणे बोलून त्यांचे मत जाणून घ्यायचे होते. आमदारांची मतं जाणून घेण्यासाठी गुप्त मतदानही करण्यात आले आहे. हे तिन्ही निरीक्षक सोमवारी सायंकाळी खर्गे यांच्या निवासस्थानी पोहोचले.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी दिल्लीत पोहोचले. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे देखील सोमवारी दिल्लीला जाणार होते. परंतु पोटाच्या संसर्गामुळे त्यांनी आपला प्रस्तावित दौरा रद्द केला. डीके शिवकुमार यांनी बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षाच्या हायकमांडने त्यांना सिद्धरामय्या यांच्यासह दिल्लीला बोलावले होते. मला पोटात संसर्ग झाला आहे आणि सोमवारी दिल्लीला जाता आले नाही. आज दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करेन, मी हा निर्णय पक्षप्रमुखांवर सोडला आहे. शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश सोमवारी दिल्लीतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

डीके शिवकुमार यांनीही सोमवारी त्यांचा 62 वा वाढदिवस साजरा केला. ते म्हणाले की, 10 मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दणदणीत विजय ही त्यांच्या वाढदिवशी जनतेने त्यांना दिलेली सर्वोत्तम भेट होती. माझे आयुष्य कर्नाटकातील जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे असंही ते म्हणाले.

डीके शिवकुमार म्हणाले की, आम्ही एक ओळीचा ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये आम्ही हा मुद्दा पक्षाच्या अध्यक्षांवर सोडू असे म्हटले आहे. मी इतरांसोबत संख्याबळावर बोलू शकत नाही, पण 135 आमदार ही माझी ताकद आहे. माझ्या अध्यक्षतेखाली पक्षाने कर्नाटकात डबल इंजिन सरकार, भ्रष्ट सरकारच्या विरोधात 135 जागा जिंकल्या. जनतेने आम्हाला पाठिंबा देऊन 135 जागांवर विजयी केले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेसचं विचारमंथन

कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेस मंथन करत आहे. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांचे मत जाणून घेतल्यानंतर काँग्रेसचे तीन निरीक्षक सोमवारी (15 मे) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी पोहोचले. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

सोनिया गांधी, राहुल गांधींचा घेणार सल्ला

एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खर्गे आता अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा सल्ला घेतील. यासोबतच येत्या 24 तासांत कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

दरम्यान, डीके शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांचं अभिनंदन केलं आहे. वास्तविक, एका पत्रकारानं विचारलं त्यावेळी सिद्धरामय्या म्हणाले आहेत की, त्यांच्यासोबत जास्त बहुमत आहे, यावर तुम्ही काय म्हणाल? डीके शिवकुमार म्हणाले की, मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. मी इथे बसलोय, माझं कर्तव्य बजावतोय.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मी एकटा म्हणजे बहुमत : डीके शिवकुमार

आपल्याकडे आमदारांचं बहुमत आहे असा क्लेम सिद्धारमय्या यांनी केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना डीके शिवकुमार म्हणाले की, धाडस असलेला व्यक्ती एकटा बहुमत निर्माण करु शकतो. मी एकटा म्हणजे बहुमत आहे. माझ्या नेतृत्वात आज कर्नाटकात 135 आमदार निवडून आले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना कर्नाटक जिंकून देण्याचं मी वचन दिलं होतं, ते मी पूर्ण केलं आहे. गेल्या पाच वर्षामध्ये काय काय झालं हे मी जाहीर करणार नाही. माझ्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी पूर्ण संख्या असून ती नेमकी किती हे आता सांगत नाही असं डीके शिवकुमार म्हणाले.