चारचाकीचा टॉप स्पीड गाडीचा टायर पाहून कळणार, या पद्धतीने करा चेक

0
5

आजकाल प्रत्येकाकडे चारचाकी गाड्या आहेत पण सर्वच लोकांना त्या बद्दल पूर्ण माहिती असतेच असं नाही. गाडीच्या टायरवर 225/50R 17 87V असे काही नंबर लिहिलेले असतात हे तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल. हे आकडे पाहून तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की गाडीच्या प्रत्येक टायरवर हा नंबर का लिहिलेला असतो. ते लिहिण्यामागचे कारण काय आणि फायदा काय.

तर टायरचा टॉप स्पीड तपासण्यासाठी हे नंबर लिहिलेले असतात. शिवाय इतरही अनेक कारणं असतात. आज आम्ही तुम्हाला टायरवर लिहिलेल्या या क्रमांकांमागील मोठं कारण सांगणार आहोत आणि टायर पाहून तुम्ही गाडीचा टॉप स्पीड कसा तपासू शकता हे ही सांगणार आहोत. गाडीच्या टायरवर लिहिलेले आकडे बघून आपल्याला टायरचा आकार, रुंदी, टायरची उंची, आणि कोणत्या रिममध्ये बसू शकतात, टायरचा टॉप स्पीड किती आहे आणि त्याचे लोड किती आहे हे कळते.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

टायरवर लिहिलेल्या आकड्यांवरून टॉप स्पीड कसा शोधायचा

आता जर तुम्हाला टायर बघून तपासायचं असेल तर तो कोणत्या टॉप स्पीडसाठी चांगला आहे किंवा या टायरचा कमाल टॉप स्पीड किती आहे, तर तुम्ही टायरवर लिहिलेल्या नंबरचा शेवटचं लेटर पाहा.

वेगवेगळे लेटर्स हाय स्पीड दर्शवतात. जसं की V म्हणजे 240kmph चा टॉप स्पीड किंवा Y म्हणजे 300kmph पर्यंतचा स्पीड. त्यामुळे याआधी माहीत नसताना टायर खरेदी केले असतील पण इथून पुढे आकडे बघूनच टायर खरेदी करा.