लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पवारांचं मोठं वक्तव्य; या नेत्यांची नावे घेत ‘मन की बात’ सांगितली

0
1

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून खासदार शरद पवार ही चर्चेत आहे. त्याच कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा शरद पवार यांनी दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार हेच अध्यक्ष असावेत अशी मागणी करत आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर शरद पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्याच दरम्यान अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षस्थानी असणे गरजेचे असल्याचे सांगत राज्यसह देशाला शरद पवार यांची गरज असल्याचे बोलून दाखवलं होतं. त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट निर्माण करण्याची ताकद फक्त शरद पवार यांच्यामध्येच असल्याचं अनेक नेत्यांनी बोलून दाखवलं होतं.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षस्थानी असणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं, यावेळी बोलतांना लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षस्थानी असणं गरजेचं असल्याचं सांगत शरद पवार हेच विरोधकांना एकत्रित आणण्याची जबाबदारी पार पाडू शकतात त्यांच्या सारखा दुसरा कुठलाही नेता नाही असं संजय राऊत म्हणाले होते. शरद पवार हेच देशातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्रित करू शकतात असं बोललं जाऊ लागलं होतं. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातील बहुतांश नेत्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली होती. त्याबाबत स्वतः शरद पवार यांनीही माहिती दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलत असतांना शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

शरद पवार यांनी विरोधकांची एकजूट करणं गरजेचं असल्याचं सांगत त्यामध्ये अनेक नेते एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत, नितीश कुमार यांच्यासह अनेक नेत्यांची नावे घेत कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून विरोधकांना एकत्रित आणण्यासाठीचा माझा सहभाग असेल असं शरद पवार म्हणाले आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका बजावणार आहेत याबाबत त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहे. एकूणच नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, के चंद्रशेखरराव, ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्रित करून भाजपच्या विरोधातील लढाई अधिक बळकट करण्यासाठी शरद पवार हे महत्त्वाची भूमिका बजावणार हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे