महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्नाटकला भाजपच्या प्रचारात, सीमाबांधवांमध्ये संताप

0

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करत बाहेर पडलेले आणि भाजपच्या साथीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे हे कर्नाटकात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती मिळते आहे. 6 ते 8 मे या कालावधीत ते प्रचार करणार असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांवरून देण्यात येत आहे. शिंदे हे सागरी किनाऱ्यांच्या भागात भाजप उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

शिंदे हे सीमाभागात प्रचार करणार नसले तरी सीमाभागातील मराठी बांधवांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटकातील भाजपच्या उमेदवाराचा प्रसार करणार असल्यानं सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा