पश्चिम महाराष्ट्रात विदर्भापेक्षा सर्वाधिक तापमान; राज्यात पुन्हा येलो अलर्ट ४दिवस पावसाचे

0
2

पुणे : राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या जवळपास आहे. तापमान वाढत असताना पुन्हा अवकाळी पाऊसही पडणार आहे. मार्च व एप्रिल महिना अवकाळी पावसाचा झाला आहे. वातावरणातील बदलामुळे कधी कुठे पाऊस पडत आहे तर कधी ऊन प्रचंड तापले आहे. पुणे वेधशाळेने राज्यातील पुढील चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. आभाळ असतानाही वाढत्या तापमान वाढीपासून दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत नाही.

राज्यात पुन्हा येलो अलर्ट

राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात २३ ते २६ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

तापमान वाढले

राज्यात सर्वाधित तापमानाची नोंद विदर्भ, खान्देशाऐवजी पश्चिम महाराष्ट्रात झाली. पाश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये सर्वाधिक ४० अंश तापमान होते. जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ किंवा राज्यातील शहरांमध्ये तापमानात वाढ आहे.

मुंबईकरांना दिलासा

राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या जवळपास असताना शनिवारी मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुंबईचे तापमान ३२.५ अंशावर होते. पुणे ३६.७ तर जळगाव ३९ अंशावर होते.

शहर तापमान
जळगाव 39
अकोला 38.2
मुंबई 32.5
पुणे 36.7
नागपूर 36.9
नाशिक 36
सोलापूर 40

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

धुळ्यात अवकाळी

धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. मार्च आणि नंतर आता एप्रिल महिन्यामध्ये सतत अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. जिल्ह्यात दिवसाचे तापमान हे 40 ° c पर्यंत असताना दुसरीकडे मात्र सायंकाळी तापमानाचा पारा खाली येतो आणि वादळी वाऱ्यासह येणाऱ्या अवकाळी पावसामुळे होत्याचं नव्हतं होतं, अशी परिस्थिती धुळे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसत आहे. तसेच जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचे दरही या अवकाळी पावसामुळे वाढत आहेत.

हे टाळा

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. विशेषतः दुपारी बारा ते तीन या वेळेत घराबाहेर जाऊ नये. सैलसर व सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी रुमाल किंवा छत्री वापरावी. दुपारी १२ ते ४ या वेळात घरात राहावे. थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला उन्हाला अडवावे. पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्या.