नाना काटे यांना पराभवातही दिलासा तर राहुल कलाटे यांच्यावर ३७२१ मतांमुळे ही नामुष्की….

0
2

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे पोटनिवडणुकांचा निकाल काल लागला. चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला. तर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार मतांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, मोठी माहिती समोर आली आहे. पराभूत होऊनही नाना काटे यांना दिलासा मिळाला आहे. पण राहुल कलाटे यांना मोठा धक्का बसला आहे. कलाटे यांच्यामुळे नाना काटे यांना पराभव पत्करावा लागला, त्या राहुल कलाटे यांचं या निवडणुकीत डिपॉझिटच जप्त झाले आहे. हजारो मते मिळुनही डिपॉझिट जप्त झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार….

उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते. मात्र काल झालेल्या मतमोजणी मध्ये राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली आहेत. मतदारसंघांमध्ये 2 लाख 87 हजार मतदान झाले. यापैकी 47 हजार 833 मते कोणत्याही उमेदवाराला मिळणे आवश्यक होते.

उमेदवारांना एकूण किती मतं

चिंचवडमध्ये एकूण 28 उमेदवार उभे होते. त्यापैकी भाजपच्या अश्विनी जगताप यांना सर्वाधिक 135603 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 99435 मते मिळाली. तर राहुल कलाटे यांना 44112 मते मिळाली आहेत. इतर उमेदवारांना एक हजाराच्या आत मते मिळाली आहेत. कलाटे यांच्यासह या सर्वच्या सर्व 28 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे