भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

0

राज्यात महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुणे महापालिकेसाठी भाजपकडून 165 उमेदवारांपैकी सुमारे 100 उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली असून ही यादी 26 डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. ही यादी आज प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जाणार असल्याची माहिती आहे. उर्वरित जागांबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत 100 पेक्षा अधिक नावांवर एकमत झाले आहे. मात्र पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्यासह विभिन्न मतदार संघातील आमदारांनी आपल्या जवळच्या लोकांची वेगवेगळ्या प्रभागांमध्ये वर्णी लागण्यासाठी मोर्चेबांधणी केली असल्याने उर्वरित जागांचा तिढा अद्याप कायम आहे. भारतीय जनता पक्षाला 2017 साली पुणेरी नागरिकांनी पहिली संधी मिळून म्हणून भरघोस मतदान दिल असलं तरीसुद्धा मागील पाच वर्षाच्या सत्तेच्या कार्यकाळाबाबत पुणेकर समाधानी नाहीत याची जाणीव भारतीय जनता पक्षाच्या विविध सर्वे मधून पक्षाकडे मिळाली आहे. पक्षातील विद्यमान नगरसेवकांपैकी 40% नगरसेवकांना पराभव सहन करावा लागत असल्याची जाणीव पक्षाला झाल्याने भरघोस ‘आयात’धोरण राबवत पक्षाने आपली पूर्वीची ताकद मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार 

स्थानिक आमदार आणि खासदार सुचक असलेले एकाच जागेवरील तीन ते चार दावेदार संधी कोणाला हा एक प्रश्न कायम असल्यामुळे मात्र 40 ते 50 जागांवर अद्याप एकमत न झाल्याने ही नावे प्रदेश स्तरावरील नेत्यांकडे पाठवण्यात येणार आहेत. या यादीला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केली जाण्याची शक्यता आहे.

पुण्यात भाजपमधील काही नेते आणि आमदारांचे नातेवाईकही इच्छुक असल्याची चर्चा आहे. मुरलीधर मोहोळ कुटुंबाकडून दुष्यंत मोहोळ, माधुरी मिसाळ कुटुंबाकडून करण मिसाळ, तर दिवंगत गिरीश बापट यांच्या कुटुंबाकडून स्वरदा बापट विधान परिषद आमदार योगेश टिळेकर माजी आमदार योगेश मुळीक आमदार सुनील कांबळे यांच्यासह असंख्य नेत्यांच्या वारसांनी इच्छुक असल्याची माहिती पक्षाला कळवली आहे. यामुळे काही प्रभागांमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

दरम्यान, भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना शिंदे गटाने पुण्यातील 34 जागांची मागणी केली असली तरी भाजपने एवढ्या जागा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे युतीतील मतभेद कायम आहेत. पुण्यात एकूण 41 प्रभागांमध्ये 165 जागा असून भाजप 125 जागांवर दावा करत आहे.

दुसरीकडे, मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसही या आघाडीत सहभागी होण्याबाबत विचार करत आहे. शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका निवडणुकीत लक्ष घातले असून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेसमध्येही युतीबाबत मतभेद असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार