महापालिकेसाठी निवडणुक आयोगाने 6 दिवसांतच उमेदवार शपथपत्रात हा महत्वाचा बदल केला; मोठ्या अडचणी वाढल्या

0

राज्य निवडणूक आयोगाकडून 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आयोगाने 12 डिसेंबरला उमेदवारी अर्ज व शपथपत्राचा नमुना प्रसिध्द केला होता. त्यानंतर सहा दिवसांतच त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

आयोगाकडून सर्व महापालिका आयक्तांना आदेश जारी करण्यात आले असून सुधारित बदलानुसारच उमेदवारांना उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. आयोगाच्या या आदेशामध्ये म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २६ सप्टेंबर, २०२३ च्या आदेशान्वये अनधिकृत बांधकाम केल्याचे सिध्द झाल्यास उमेदवार अनर्ह ठरु शकतो.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार 

याअनुषंगाने दि. १३ ऑगस्ट, २०१८ च्या आदेशासोबतच्या शपथपत्रातील मुद्दा क्र. १६.५ मध्ये सुधारणा केली आहे. सदर सुधारणा अंतर्भूत करण्याकरीता राज्य निवडणूक आयोगाने दि. १२ डिसेंबर, २०२५ काढलेल्या आदेशातील मुद्दा क्र.४ मध्ये “यथास्थिती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १०/मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६ मधील तरतुर्दीचे मी वाचन केले असून त्यानुसार मी महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अपात्र नाही.” असे नमूद करण्यात आले होते. त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.

सुधारित शपथपत्रात काय ?

शपथपत्रात आता “यथास्थिती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १०/मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६ मधील तरतुदींचे मी वाचन केले असून त्यानुसार मी महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अपात्र नाही. मी स्वतः अथवा माझी पत्नी/माझे पती/माझे अवलंबित यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १०/१७)/मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६ (१८) मधील तरतुदीनुसार जर मी निवडून आल्यावर अनधिकृत बांधकाम केले असल्याचे सिध्द झाल्यास मी नगरसेवक पदावर राहण्यारा अनर्ह उरेन, वाची मला जाणीव आहे.” असे नमूद केले जाणार आहे.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

त्यामुळे दि. १२ डिसेंबर, २०२५ घ्या आदेशासोबत जोडलेल्या शपथपत्रातील मुद्दा क्र. १६.५ सुधारीत करुन शेवटचे पृष्ठ या सुधारणेसह राहील. त्यानुसारच उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्राचे नमुने सुधारीत करुन उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत.