राष्ट्रवादी 40 स्टार प्रचारक यादी जाहीर; यादीतून मंत्री छगन भुजबळ यांचे नाव गायब राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा

0

आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ही यादी जाहीर केली असून यात जवळपास ४० जणांची स्टार प्रचार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचे नाव आहे.

राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून राज्यभरातील मंत्री, आमदार आणि नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांचा देखील समावेश आहे. तसेच अमोल मिटकरी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाकडून स्टार प्रचारकाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील स्टार प्रचारक असणार आहेत. मात्र मंत्री छगन भुजबळ यांचे नाव वगळण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून मंत्री छगन भुजबळ यांचे नाव गायब असल्यानं राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील अजित पवार गटाचे एकमेव आमदार अनिल पाटील यांच्याकडे देखील पक्षाने स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

राष्ट्रवादीकडून जाहीर स्टार प्रचारकांची नावे?

राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील – चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

त्याचसोबत नेते सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक – शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, श्रीमती प्रतिभाताई शिंदे, विकास पासलकर या सर्व ४० जणांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!