कोथरूड ग्रामदैवत म्हातोबा देवस्थानच्या सभागृहाचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने रुपडे पालटले असून कोथरुडकरांना मंगल कार्यासाठी अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त बँक्वेट हॉल उपलब्ध झाला असून, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सुचनेनंतर सदर सभागृह अतिशय अल्पदरात मिळणार आहे. नव्या बँक्वेट हॉलचे लोकार्पण दिनांक ३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि म्हातोबा देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ आणि कोथरुडकर ग्रामस्थांच्या उपस्थितीत सायं. ०५.०० वा. होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन म्हातोबा देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कोथरुड हे अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले उपनगर म्हणून सर्वत्र परिचित आहे. त्यामुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना इथल्या सोईसुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे नेहमीच आग्रही असतात.






कोथरुडमधील कष्टकरी कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी सातत्याने ‘अल्पदरात दिवाळी फराळ’ उपलब्ध करुन देणे, वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी ‘मानसी’ उपक्रम, विवाह इच्छुक मुलींची सन्माने पाठवणी व्हावी यासाठी ‘झाल’, त्याशिवाय गरिब कुटुंबातील गरोदर महिलांचे बाळंतपण सुरक्षितपणे व्हावे यासाठी ‘सुखदा’, असे एक ना अनेक उपक्रम सातत्याने राबवित असतात.
कोथरुडमधील प्रत्येक मुलीचे लग्न अतिशय थाटामाटात व्हावे. तसेच, त्यांनाही लग्न सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटता यावा; यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड देवस्थानच्या जागेत गंगाराम सभागृहाच्या टेरेसचा लोक सहभागातून विकास करण्यात आला असून, अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असा बँक्वेट हॉल उभारण्यात आला आहे. या मध्ये मंगल कार्यासाठी 6000 स्क्वेअर फुटाचा प्रशस्त बँक्वेट हॉल, ५०० नागरिक एकाचवेळी जेवण करतील असा डॉयनिंग हॉल, वधू- वरांसाठी अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त स्वतंत्र कक्ष, प्रशस्त लॉबी, अशा अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, गरिब कुटुंबातील मुलींची लग्ने या सभागृहात व्हावीत, अन् सर्वांनाच मंगल कार्याचा अभिमान वाटले, यासाठी अतिशय नाममात्र दरात हे सभागृह उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व विश्वस्त मंडळांना केली होती. त्यांनीही ना. पाटील यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत, नाममात्र दरात सभागृह उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना अभिमान वाटेल, असा हा बँक्वेट हॉल उपलब्ध झाला आहे.













