मारणे टोळी सूत्रधार रुपेश मारणेच्या मुसक्या आवळल्या; भाजप कार्यकर्त्याला मारहाण ९ महिने होता फरार

0

पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये फेब्रुवारीमध्ये शिवजयंती दिवशी अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करुन फरार झालेल्या गजानन मारणे टोळीचा सदस्य रुपेश मारणे याला कोथरुड पोलिसांनी मुळशीतील आंदगावमधून अटक केली आहे. गजानन मारणे तुरुंगात असल्याने रुपेश टोळीची सर्व सुत्रे चालवत होता.

कोथरुड भागात १९ फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. जोग हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त करुन आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र यानंतर रुपेश मारणे हा फरार झाला अनेक महिने तो लपून बसला होता, अखेर सोमवारी रात्री मुळशीतील आंदगावमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या वाद झाला. या वादात रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदारांनी संगणक अभियंता देवेंद्र जोग याला मारहाण केली. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला मात्र रुपेश मारणे फरार झाला. पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले होते.