बळीराजाचा आयुष्य चिंतेच अन् दादा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात लावणी…. महिलेचे ठुमके…. मस्त चाललय तुमचं!

0

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नागपूर कार्यालयाचे उद्घाटन अवघ्या दोन महिन्यापूर्वी अजित पवार यांच्याच हस्ते झाले होते. या कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्कासह पक्ष वाढवण्याबाबतचे उपक्रम अपेक्षित आहे.परंतु या कार्यालयात चक्क दिवाळी मिलन कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांनी ठुमके लावत लावणी सादर केली. सर्वसामान्य नागरिकांना वेळ किती झाली हे घड्याळ बघून कळते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घड्याळ आहे. परंतु अजित पवार यांच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील अधिकृत पक्ष कार्यालयात दिवाळी मिलनच्या नावाखाली ‘वाजले की बारा.. आता जाऊ द्या की घरी’ ही लावणी जोरदारपणे सादर केली.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय

पक्ष कार्यालयात सादर केलेल्या या लावणीला तिथे उपस्थित असलेले शहर अध्यक्ष इतर पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि जोरदार शिट्ट्या वाजवत दादही दिली. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर पक्षाच्या उपक्रमावर प्रश्न उपस्थित झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नागपुरातील मुख्य कार्यालय गणेश पेठ परिसरात असून अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच अजितदादांनी या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. त्याच कार्यालयातील मुख्य हॉलमध्ये रविवारी पक्षाचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी कार्यकर्त्यांसाठी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात जोरदार नृत्यांचाही कार्यक्रम पार पडला.

अनेकांनी त्यांची कला सादर केली. यावेळी मराठीच्या अत्यंत गाजलेल्या लावण्या ‘वाजले की बारा’ आणि ‘मला इश्काच्या झुल्यात झुलवा’ सुद्धा त्या ठिकाणी सादर करण्यात आल्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि विदर्भातील प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भव्य दिव्य पोस्टर समोरच सादर केलेली ‘वाजले की बारा आता जाऊ द्याना घरी..’ ही लावणी सर्वांचे लक्ष वेधून गेली.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

शहराध्यक्ष म्हणतात कला सादर करण्यात गैर काय…..

प्रसिद्धी माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांचे मत जाणून घेतले. अहिरकर म्हणाले, दिवाळीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना त्यांची कला मोकळेपणाने सर्वांसमोर सादर करता येईल यासाठी ही खास संधी दिली. पक्ष कार्यालयात लावणी सादर करण्यात काहीही गैर नाही. लावणी सादर करणारी महिला पक्षाची पदाधिकारी असल्याचा दावाही अहिरकर यांनी केला. दरम्यान सोशल मीडियावर सध्या राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयातील वाजले की बारा ही लावणी चांगलीच वायरल होत असून पक्ष कार्यालयातील ही लावणी मतदारांमध्ये पक्षाचे बारा वाजवते की काय अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.

अधिक वाचा  एरंडवण्यात दिवाळीनिमित्त आपुलकीचे नाते दृढ करणारा भाऊबीजेचा सण; चंद्रकांतदादांच महिला भगिनींतर्फे औक्षण