एरंडवण्यात दिवाळीनिमित्त आपुलकीचे नाते दृढ करणारा भाऊबीजेचा सण; चंद्रकांतदादांच महिला भगिनींतर्फे औक्षण

0

भारतीय जनता पार्टी मंदार बलकवडे यांच्या वतीने दीपावलीचे औचित्य साधून भाऊबीजनिमित्त खिलारेवाडी, गावठाण, भालेकर चाळ, रजपुत वीटभट्टी, ढेरे चाळ, कवडे प्लॉट, प्लॉट नं१४ व १५ येथील स्थानिक महिला भगिनींसोबत स्नेह, प्रेम आणि आपुलकीचे नाते दृढ करणारा हा भाऊबीजेचा सण आनंद आणि उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी ना.चंद्रकांत दादा पाटील व भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरजभाऊ घाटे यांना उपस्थित महिलांनी औक्षण केले, ना.चंद्रकांत दादा व धीरजजी यांच्या शुभहस्ते उपस्थित सर्व महिला भगिनींना साडी भेट देण्यात आली. दादांनी व घाटेजींनी सर्व महिलांना दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्या, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी करत असलेल्या सामाजिक कार्याचे चंद्रकांत दादा व धीरजभाऊ घाटे यांनी कौतुक केले.

अधिक वाचा  महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दुर्देवी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

यावेळी भाजपा कोथरूड मंडल सरचिटणीस सौ.गायत्रीताई लांडे, श्री.कुणाल तोंडे, श्री.शंतणू खिलारे, श्री.शिवाजी शेळके, श्री.श्रीकांत गावडे, श्री.गजानन माझिरे, श्री.वैभव जमदाडे, श्री.अमोल डांगे, श्री.चेतन धाडवे, श्री.गणेश थरकुडे, श्री.संतोष लांडे, सौ.सुलभाताई जगताप, सौ.संगिताताई शेवडे, श्री.अविनाश बलकवडे, श्री.विनय सुभेदार, अभिषेक दळवी, वैभव धापसे, प्रणव गरूडकर, अनुज मुळीक, साजिद तांबोळी, सुदर्शन मोतीवाले, ऋषिकेश देव्हडे, रोहन ढमाले, रोहित सुतार, अतुल सणस, सुधाकर राऊत, सागर सुतार, रोहित बलकवडे यांच्यासह भाजपा व देशप्रेमी मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.