महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दुर्देवी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

0

फलटणमधील जिल्हा उपरुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे, मात्र तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार राहणार नाही. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, माजी खासदाऱ रणजित निंबाळकर यांचा कसलाही संबंध नाही, त्यांचे आणि सचिन पाटील यांचे विनाकारण नाव घेतले जात आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसडणे सहन करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. मवा एवढीशी जरी शंका असती, तर मी हा कार्यक्रम रद्द करुन मी या ठिकाणी आलो नसतो. अशा गोष्टीत मी पक्ष, व्यक्ती अन् राजकारण पाहत नाही. या माझ्या लहान बहिणीचा विषय आहे, तिथे मी काहीच तडजोड करत पण त्याचवेळी प्रेताच्या टाळूवरचं लोणी कोणी खात असेल आणि प्रत्येक गोष्टीत जर कोणी असेल तर तेही मी सहन करणार नाही.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

राहुल गांधींचा सरकारवर गंभीर आरोप

महाराष्ट्रातील सातारा येथे छळ आणि बलात्कार झाल्यानंतर महिला डॉक्टरची आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी शोकांतिका आहे असे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

इतरांचे दुःख कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी एक आशादायक डॉक्टर व्यवस्थेतील भ्रष्ट अधिकारी आणि गुन्हेगारांच्या छळाला बळी पडली. गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवलेल्यांनी या निष्पाप महिलेविरुद्ध सर्वात घृणास्पद गुन्हा केला. बलात्कार आणि शोषण. भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला असल्याचे वृत्तही समोर आल्याचे राहूल गांधी यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा