आदेश आला घडामोडींना वेग! मुंबईत रात्री मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक फडणवीसही हजर राहणार

0

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून रणनीती आणि डावपेच यांवर मोठा खल चालू आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतेच नवी मुंबईतील विमानतळाचे उद्घाटन केले आहे. असे असतानाच आता राजधानी मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपाच्या गोटात पडद्यामागे मोठ्या हालचाली होत असून आता मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपाच्या मुंबईतील सर्व आमदार आणि खासदारांची एक बैठक बोलावण्यात आली आहे.

रात्री आठ वाजता होणार बैठक

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे आमदार आणि खासदार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. आज (8 ऑक्टोबर) रात्री आठ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत मोदी आमदार, खासदारांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. या बैठकीचा नेमका विषय समजू शकलेला नाही. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस हे देखील राहणार उपस्थित

भाजपाचे मुंबईतील आमदार आणि खासदारांची मोदी चर्चा करणार आहेत. रात्री आठ वाजता राजभवन येथे ही बैठक होईल. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: उपस्थित राहणार आहेत. सोबतच मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम हेदेखील या बैठकीला उपस्थित असतील. आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फार महत्त्वाची मानली जात आहे.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

मुंबई जिंकण्यासाठी डावपेच

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा एकत्र लढवणार आहेत. महायुती म्हणून ते महाविकास आघाडीला सामोरे जाणार आहेत. या निवडणुकीत मुंबईची महापालिका सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे. मुंबईवरील ठाकरेंचे वर्चस्व कमी करण्यासाठी काहीही झालं तरी मुंबई पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून डावपेच आखले जात आहेत. एकनाथ शिंदे यांनीही या निवडणुकीसाठी आपली ताकद लावलेली आहे. असे असताना आता नरेंद्र मोदी मुंबईतले भाजपाचे आमदार आणि खासदार यांच्याशी बोलणार आहेत. त्यामुळे आता या बैठकीतून नेमके काय समोर येईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर