सदभावना आणि वक्तशीरपणा कार्यकर्त्याच्या अंगी असायला हवा – कैलासचंद्र मोहिते

0

मुंबई दि. २३ (रामदास धो. गमरे) “बौद्ध धम्माचा पाईक म्हणून कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःच्या आचरणात, वागणुकीत व कार्यपद्धतीत काही विशिष्ट गुण आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. कार्यकर्ता हा केवळ समाजाला दिशा देणारा नसून प्रत्येक समूहाशी, प्रत्येक व्यक्तीशी सुसंवाद साधणारा पूल असतो. त्यामुळे त्याने प्रथम लोकांशी मनापासून संवाद साधून त्यांचे प्रश्न, अडीअडचणी समजून घ्यावेत आणि त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे. कार्यकर्त्याचा शब्द हा त्याची ओळख असतो दिलेला शब्द मोडणे ही त्याची पराभूतता ठरते त्यामुळे आपले बोलणे नेहमी विचारपूर्वक, परिस्थितीनुरूप आणि संवेदनशील असावे. कोणत्याही शब्दामुळे एखादी व्यक्ती दुखावली जाणार नाही अशी दक्षता घेणे आवश्यक आहे. कार्यकर्त्याच्या शब्दाला वजन, विश्वासार्हता आणि किंमत असली पाहिजे, लोभ, स्वार्थ किंवा दिखावा हा कार्यकर्त्याच्या अंगी असता कामा नये उलट त्याच्याकडे शिस्त, वक्तशीरपणा व पारदर्शकता ही तत्त्वे हवीत, आपल्या कामाची दैनंदिन नोंद ठेवणे, पुढील कामांचे नियोजनपद्धतीने लेखन करणे आणि वेळोवेळी त्याचा आढावा घेणे ही जबाबदारी कार्यकर्त्याने अंगीकारावी तसेच महापुरुषांचे विचार वाचणे, त्यांचे मनन व चिंतन करणे आणि ते आपल्या जीवनात उतरवणे हे कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे फक्त विचार वाचून थांबणे नव्हे तर त्याच मार्गाने चालत समाजासाठी प्रेरणादायी ठरावे असा आदर्श कार्यकर्त्याचा असावा. सोबतच इतरांचा आदर करणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही उदार वृत्ती कार्यकर्त्याकडे असावी, समाजकार्य करताना कधीही नकारात्मकता किंवा मत्सर मनात न ठेवता नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा कारण कार्यकर्ता हा स्वतःच्या कृतीने, नम्रतेने आणि सेवाभावानेच लोकांच्या मनात स्थान मिळवतो म्हणून बौद्ध धम्माचा पाईक असणाऱ्या कार्यकर्त्याच्या अंगी सदभावना व वक्तशीरपणा असायला हवा” असे प्रतिपादन प्रवचनकार कैलासचंद्र गंगाराम मोहिते यांनी बौद्धजन सहकारी संघ आयोजित ऑनलाईन वर्षावास प्रवचन मालिकेचे अकरावे पुष्प गुंफत असताना केले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पातळीवर गाव शाखेच्या व मुंबई येथे मुंबई शाखेच्या एकमताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत चाललेल्या वर्षावास प्रवचन मालिकेद्वारे गावागावात, घराघरात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्कार्य संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, सदर प्रवचन मालिकेचे अकरावे पुष्प बौद्धजन सहकारी संघ मुंबईचे कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली Google Meet app द्वारे ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले, सदर अकराव्या पुष्पाच्या प्रसंगी बौद्धजन सहकारी संघाच्या मुंबई विभाग क्र. ५ चे विभाग अधिकारी संतोष पवार व परिवारास पूजेचा मान देऊन त्यांच्या शुभहस्ते पूजाविधी संपन्न करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश गमरे यांनी प्रभावी व लाघवी भाषाशैलीत केले तर वक्ता व उपस्थितांचे स्वागत संस्कार समिती अध्यक्ष संदीप गमरे यांनी केले, अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष व बौद्धजन सहकारी संघ, मुंबईचे कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी “प्रवचनकार कैलासचंद्र गंगाराम मोहिते यांनी ‘बौद्ध धम्मातील कार्यकर्ता’ या विषयावर आपले विचार मांडत असताना कार्यकर्ता कसा असावा यासंदर्भात अनेक उदाहरणे देऊन अतिशय सुटसुटीत व यथायोग्य मांडणी करून कार्यकर्ता कसा असावा हे पटवून दिले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व उपस्थितांचे आभार व्यक्त नायगाव येथे आपण २८ सप्टेंबर २०२५ रोजी वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ करीत आहोत तसेच त्याच कार्यक्रमात आपल्या गुहागर तालुक्यातील आर्या मनोज जाधव हिने राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकावून तालुक्याचे नाव उंचावल्यामुळे तिचा सत्कार करण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आपण आजवर जशी साथ दिली ती अशीच कायम राहिली तर अजूनही उत्तमोत्तम कार्यक्रम यशस्वीपणे घेऊन धम्माचा प्रचार व प्रसार घरोघरी करता येईल” असे नमूद करीत सर्वांना मंगलकामना दिल्या.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सदर कार्यक्रमास आजी-माजी विश्वस्त, आजी-माजी मध्यवर्ती कमिटी, त्यांचे चेअरमन, आजी माजी विभाग अधिकारी, गाव व मुंबई या दोन्ही शाखांतील सर्व सभासद, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच मुंबई विभाग क्र. ५ चे विभाग अधिकारी संतोष पवार व परिवार, व्याख्याते कैलासचंद्र गंगाराम मोहिते, गाव व मुंबई शाखेचे आजी माजी विश्वस्त, आजी माजी कार्यकारिणी, उपासक, उपासिका, हितचिंतक व उपस्थितांचे आभार मानून संदेश गमरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.