भावा-बहीणीच्या प्रेमळ नात्याचा, विश्वासाचा पवित्र हिंदू सण असलेला रक्षाबंधनाच्या खास दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये महिलांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. लाडक्या बहिणींना भावाकडून ज्याप्रमाणे हमखास भेट म्हणून काही वस्तू मिळत असतानाच राज्य शासनाच्या मार्फत सुद्धा पहावा बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण साजरा करण्यासाठी रक्षाबंधनापूर्वी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. यावेळी, अनेक राज्यांच्या सरकारने महिलांना प्रवासात विशेष सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता उत्सवादरम्यान घरी ये-जा करताना त्यांना पैशांची चिंता करावी लागणार नाही.






देशातील काही राज्यांमध्ये बस सेवेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की बहिणींना त्यांच्या भावांना कोणत्याही अडचणीशिवाय भेटता यावे. प्रवास सोपा असावा आणि कोणताही खर्च नसावा. हा विचार लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. असे निर्णय यापूर्वीही काही ठिकाणी घेण्यात आले होते. पण यावेळी हा निर्णय देशातील एक पेक्षा अधिक राज्यांमध्ये घेण्यात आला आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती….
दिल्ली, पंजाब आणि कर्नाटक बस प्रवास मोफत
दिल्लीमध्ये महिला या डीटीसी आणि क्लस्टर बसमध्ये भाडे न भरता प्रवास करू शकतात आणि ही सुविधा रक्षाबंधनाच्या दिवशीही सुरू राहील. विशेष म्हणजे, केवळ दिल्लीतच नव्हे तर पंजाब आणि कर्नाटकमध्येही महिलांसाठी बस प्रवास मोफत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये महिलांना राज्य सरकारी बसमध्ये तिकिटाशिवाय प्रवास करता येतो. रक्षाबंधनाच्या दिवशीही ही सुविधा सुरू राहील. यामुळे महिला कोणत्याही खर्चाशिवाय सणासुदीला त्यांच्या भावांना भेटायला जाऊ शकतील. या निर्णयामुळे महिलांना दिलासा मिळणार आहेच, पण त्यांना सणाच्या दिवशी प्रवास करताना कोणताही अडथळा येणार नाही. सरकारचे हे पाऊल महिलांसाठी एक मोठी भेट ठरत आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी या राज्यांमध्येही मोफत करा बस प्रवास
रक्षाबंधनाच्या निमित्ताने, केवळ दिल्ली, पंजाब आणि कर्नाटकमध्येच नाही तर इतर अनेक राज्यांमध्येही महिलांना बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही महिला आणि लहान मुलांना उत्तराखंडमध्ये सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. 9 ऑगस्ट रोजी ही सुविधा मध्य प्रदेशातील भोपाळ आणि इंदूर येथेही लागू होईल. 9 आणि 10 ऑगस्ट रोजी महिलांना राज्य परिवहन बसमध्ये मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा राजस्थान सरकारने केली आहे. चंदीगडमध्येही महिलांना ट्रायसिटी क्षेत्रातील सर्व लोकल बसेसमध्ये मोफत प्रवास करता येईल. परंतु ही सुविधा लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये लागू होणार नाही.










