IPS जालिंदर सुपेकरांची ‘डाऊनग्रेड’ बदली; खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्र परवाना हगवणे कुटुंबीयांना केलेली मदत भोवली? 

0
4

महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची कारागृह व सुधारसेवा विभागाच्या महासंचालक पदावरून तडकाफडकी बदली केली आहे. त्यांची नियुक्ती आता उप महासंचालक, गुप्तवार्ता विभाग, राज्य गुप्तवार्ता, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. ही बदली महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 22 नुसार करण्यात आली आहे.

सुपेकर यांचं पूर्वीचं पद म्हणजे कारागृह व सुधारसेवेचे महासंचालक हे एक महत्त्वाचं प्रशासकीय पद मानलं जातं. मात्र त्यांचं नवीन पद हे तुलनात्मकदृष्ट्या अत्यल्प अधिकार असलेलं आणि विभागीय निर्णय प्रक्रियेत फारसं प्रभावी नसलेलं मानलं जातं. त्यामुळेच ही बदली ‘डाऊनग्रेड’ मानली जात आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

गृह विभागाच्या आदेशानुसार ही बदली ‘प्रशासनिक कारणास्तव’ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं असलं तरी पोलीस खात्यात वर्तुळात ही बदली ही शिक्षा म्हणून केल्याची चर्चा आहे. काही वादग्रस्त निर्णय, अंतर्गत मतभेद आणि वरिष्ठ पातळीवरील नाराजीमुळेच सुपेकर यांना दुय्यम पदावर हलवलं गेलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा निर्णय 30 एप्रिल 2024 पासून तत्काळ प्रभावात आला असून संबंधित आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हगवणे बंधूंना मदत

हगवणे बंधूना खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्र परवाना देण्यात जालिंदर सुपेकर यांनी मदत केल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा जालिंदर सुपेकर यांची उप महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, येथे तडकाफडकी बदली केल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली