एसटीचा प्रवास येथे महागला! तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ होणार; एसटी महामंडळाची मोठी अपडेट

0

परळ आणि प्रभादेवी परिसरास पूर्व-पश्चिमेस जोडणारा एल्फिन्स्टन पूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे एसटी परळ आगारातील बससेवेच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. पर्यायी मार्गावरील अंतर वाढल्याने तिकीटदरात एक टप्प्याने वाढ होणार असल्याने तिकीटदर १० रुपये वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळातून देण्यात आलेली आहे. सध्या परळ व प्रभादेवी परिसरात पूर्व-पश्चिमेला जोडणारा एल्फिन्स्टन पूल तोडून नव्या उड्डाणपुलाचे आणि वरळी- शिवडी- वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाचे काम मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. एल्फिन्स्टन पूलमार्गे जाणारी परळ आगाराची वाहतूक इतर मार्गावर वळवून वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

परळ आगारात दादर येथून जाताना सध्या सुरू असलेल्या मार्गावरील वाहतुकीत बदल करून एसटी महामंडळाच्या बस मडके बुवा चौक (परळ टी.टी. जंक्शन) सरळ घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने- कृष्णनगर जंक्शन- परळ वर्कशॉप- सुपारी बाग जंक्शन- भारत माता जंक्शन- संत जगनाडे चौक उजवे वळण घेऊन साने गुरुजी मार्गाने चिंचपोकळी ब्रिजवरून कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (चिंचपोकळी जंक्शन)वरून उजवे वळण घेऊन एन. एम. जोशी मार्गाने परळ आगारात दाखल होतील आणि त्याच मार्गाने परत मार्गस्थ होतील.