पालकमंत्रीपद बंडखोरांच्या तलवारी म्यान? घोडे गंगेत न्हाले,  मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कामी? पडद्यामागे काय घडामोडी?

0

नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. नाशिकमध्ये दादा भुसे आशावादी आहेत तर दुसरीकडे आदिती तटकरे यांच्या जागेवर ऐवजी भरत शेठ गोगावले यांचा दावा कायम आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने भाजपासाठी ही मोठी संधी आहे. त्यासाठीचे मोठे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे भाजप नाशिकचे पालकमंत्री पद सहजासहजी सोडेल असे वाटत नाही. गेल्या दोन दिवसांपासून गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री असल्याचे संकेत भाजपाच्या गोटातून देण्यात येत आहे. तर आज तशी बॅनरबाजी पण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रायगड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  बळीराजाचा आयुष्य चिंतेच अन् दादा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात लावणी…. महिलेचे ठुमके…. मस्त चाललय तुमचं!

एकाच वाहनातून प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर आहेत. दोघांनी महाड येथील चवदार तळ्याला भेट दिली. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला जात असताना फडणवीस यांनी त्यांच्या वाहनात एकनाथ शिंदे, भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांना सोबत घेतले. चार जणांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याने पालकमंत्री पदावर तोडगा निघण्याची शक्यता वाढल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आता एकनाथ शिंदे अथवा अजितदादा यापैकी कोण तोडग्यावर राजी होते आणि एक पाऊल मागे घेते हे लवकरच समोर येईल.

गिरीश महाजन यांचे बॅनर चर्चेत

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेते गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असल्याचे संकेत भाजपाच्या गोटातून समोर येत आहेत. तर आज मंत्री गिरीश महाजन यांचे नाशिकमध्ये लागलेले बॅनर चर्चेत आले आहे. हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री आशयाचे बॅनर शहरात लागले आहे. पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाही समर्थकांकडून बॅनरबाजी सुरू आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा नाशिकचा कारभार गिरीश महाजन यांच्याकडे येणार अशी भाजपच्या गोटात चर्चा सुरू आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार अशी चर्चा असतानाच ही बॅनरबाजी होत आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांसह इतर ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दुर्देवी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार