वारजे साहित्य कट्ट्या तर्फे मराठी भाषा गौरव दीनचे आयोजन.. मराठी स्वाक्षरी अभियानात नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

0

वारजे : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वारजे साहित्य कट्ट्याच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी स्वाक्षरी अभियानात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत मराठीतून स्वाक्षरी केल्या.

माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिलाच मराठी भाषा गौरव दीन असल्याने वारजे परिसरातील नागरिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मराठी भाषा ही आपली मातृभाषा असून तीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे आपली मातृभाषा टिकावी आणि ती आणखी समृद्ध व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करावा असे आवाहन बाबा धुमाळ यांनी यावेळी केले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

डी. के. जोशी, नंदकुमार बोधाई, मानसी नलावडे, सुरेश जाधव, महादेव गायकवाड, एस. आर. पाटील, वि दा पिंगळे, राजेंद्र वाघ, महेश कुलकर्णी, अनिल गायकवाड, आप्पा लंगडे, जयंत मोहिते यावेळी उपस्थिती होते.पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत चालणारा वारजेतील साहित्य कट्टा हा पुणे शहरातील सर्वात जास्त मराठी भाषा संवर्धनासाठी उपक्रम राबवणार कट्टा असून सातत्याने साहित्य विषयक कार्यक्रम या कट्ट्यावर राबवले जात असतात. वारजेतील नवोदित साहित्यिक, कवी, कलावंतांना हक्काच व्यासपीठ मिळावं म्हणून बाबा धुमाळ व दिपाली धुमाळ यांच्या पाठपुराव्यातून या साहित्य कट्टा वारजेची निर्मिती झाली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

याच महिन्यात साहित्य कट्टा वारजे ने घेतलेले दुसरे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले होते. जेष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी या संमेलनाचे अध्यक्ष भूषवले होते. मोठ्या उत्साही वातावरणात हे एकदिवसीय संमेलन वारजेकरांच्या उपस्थिती संपन्न झाले होते. असे एक दिवसीय साहित्य संमेलन घेणारा वारजे साहित्य कट्टा हा एकमेव साहित्य कट्टा आहे.