आत्ता एसटीचा मोफत प्रवासही बंद होणार? परिवहन मंत्र्यांची मोठी अपडेट; आमचा याला विरोध असून, आम्ही

0

महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटामध्ये अर्धी सूट देण्यात आली आहे, त्यामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटाच्या दरात राज्यभरात कुठेही प्रवास करता येतो. त्यामुळे महिलांची एसटी प्रवासाला पसंती मिळत असून, एसटीचे प्रवासी वाढण्यास मदत झाली आहे, दुसरीकडे वय वर्ष 65 वर्षांवरील नागरिकांना देखील प्रवास दरात अर्धी सूट मिळते, तर ज्यांचं वय हे 75 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा स्त्री व पुरुषांना राज्यभरात कुठेही एसटीनं मोफत प्रवास करता येतो. तसेच विद्यार्थ्यांना देखील रोजच्या प्रवासासाठी एसटीकडून पासच्या स्वरुपात मोठी सवलत देण्यात येते. मात्र एसटी तोट्यात असल्यामुळे मोफत प्रवासाची योजना बंद होणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

नेमकं काय म्हणाले सरनाईक

एसटी बसला सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं. सुरक्षित आणि स्वस्त प्रवासासाठी प्रवासी एसटीलाच पसंती देतात. लांबच्या पल्ल्यासाठी एसटी बसच्या प्रवासाला पसंती दिली जाते. तसेच परिवहन विभागाने एसटीच्या माध्यमामथून प्रवाशांसाठी अनेक सोई उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र एसटी तोट्यात असल्यामुळे मोफत प्रवास बंद होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा खुलासा केला आहे. मोफत प्रवासाचा निर्णय बंद होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे, त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

अधिक वाचा  दहशतवादी संघटनेच्या संपर्कातील सोलापूरचा संगणक अभियंता गजाआड; एटीएसची पुणे स्टेशनवर मोठी कारवाई

दरम्यान डिजिटल बोर्ड लावण्यासंदर्भात देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. एसटीला विश्वासात घेतल्याशिवाय हे करणं चुकीचं आहे, एसटी महामंडळाला माहिती व जनसंपर्क विभागाने विश्वासात घेतलं नाही हे चुकीचं आहे. आम्ही यामाध्यमातून उत्पन्न वाढवतोय, मात्र आम्हाला माहिती व जनसंपर्क विभागाने विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. आमचा याला विरोध असून, आम्ही माहिती व जनसंपर्क विभागाला टेंडर प्रोसेस थांबवण्यास सांगितलं आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कर्नाटकात बसवर हल्ला झाला, चालकाला दमदाटी करण्यात आली, त्यानंतर आम्ही बसेस थांबवल्या आहेत. कोणी अस्मितेवर घाला घालत असेल तर हे चुकीचं आहे, असंही यावेळी सरनाईक यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दुर्देवी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार