कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर हल्ला, एक जण गंभीर जखमी हा गँगवॉर नाही आरोपी ताब्यात तपास सुरु: पोलीस

0

कोथरुड मधील सागर कॉलनी भाजी मार्केट येथे सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास एका व्यक्तीवर तीन ते पाच युवकांनी कोयत्या सारख्या धारदार शस्रांनी वार केले. वार केल्यानंतर हल्लेखोर सागर कॉलनीतील गल्लीमध्ये जोरात ओरडा करत, कोयते नाचवत पळाले. या घटनेमुळे कोथरुड मध्ये दहशत पसरली आहे.

सागर कॉलनी डीपी रस्त्यावर भाजी मंडई भरते. भाजी खरेदी व विक्रीसाठी आलेल्यांमुळे हा रस्ता सायंकाळी गजबजलेला असतो. त्यामुळे येथे नेहमी वाहतुक कोंडी होते. नेमके अशावेळी घडलेल्या या थरारक घटनेच्या प्रत्यदर्शीने सांगितले की, येथे असलेल्या कच्छी दबेलीच्या हातगाडी पाशी दुचाकीवर थांबलेल्या युवकावर कोयता घेवून आलेल्यांनी आरडाओरडा करत जोरदार वार केले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

येथे असलेले शेकडो लोक या घटनेमुळे अचंबित झाले. एका भाजी विक्रेत्या महिलेला भोवळ आली. कच्छी दाबेलीवाला व जवळचे दुकानदार पळून गेले. काही लोकांनी पोलिसांना फोन केला. पण पोलिस येई पर्यंत गुन्हेगार युवक पळून गेले होते.

यासंदर्भात कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीप देशमाने म्हणाले की, हा गँगवॉरचा प्रकार नाही. संबंधितांना आम्ही ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास सुरु आहे. एक जण गंभीर जखमी झालेला आहे.

या घटनेमुळे कोथरुड मध्ये वेगवेगळ्या चर्चेना उधाण आले. अल्पवयीन युवकांकडून गुंड लोक गुन्हे घडवून आणत आहेत. कोथरुड सुरक्षित आहे का, पोलिस ठाणे जवळ असूनही अशा घटना घडतात, एवढे लोक तेथे असून एकालाही त्या युवकाला वाचवण्याची हिम्मत झाली नाही. पोलिसांना पोहचायला वेळ लागतो ही चिंताजनक बाब आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार