भारताचं स्वदेशी AI मॉडेल दहा महिन्यातच,भारतीय कंटेक्स्ट आणि कल्चर असणार केंद्र सरकारची मोठी घोषणा

0

आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अमेरिकेची मक्तेदारी आहे. अमेरिकेच्या वर्चस्वाला चीनचं लहानसं स्टार्टअप असेलल्या डीपसीकने हादरा दिला. डीपसीकने ओपनएआय, जेमीनी यांच्या एआय मॉडेलला आव्हान दिलंय. यातच आता भारत सरकारने एआय आणणार असल्याचं सांगितलं. चॅट जीपीटी सारखं मॉडेल भारतात आणण्याची तयारी केली जात आहे.

माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताान म्हटलं की, भारत स्वत:च्या मोठ्या लँग्वेज मॉडेलवर म्हणजेच एलएलएमवर काम करत आहे. येत्या दहा महिन्यात हे मॉडेल तयार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अश्विनी वैष्णव म्हणाले की, आम्ही फ्रेमवर्क तयार केलं आणि आज ते लाँच केलं जाणार आहे. आमचा फोकस एआय़ मॉडेल्स तयार करण्यावर असेल. यात भारतीय कंटेक्स्ट आणि कल्चर असणार आहे.

अधिक वाचा  नेत्यांची प्रसारमाध्यमांत महायुतीची हाक आणि मेळाव्यात ‘एकला चलो’चा नारा भूमिका स्पष्ट नसल्याने इच्छुकांची मोठी अडचण?

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, डीपीसीक एआयला २ हजार जीपीयूने ट्रेन केलंय. चॅट जीपीटीला २५ हजार जीपीयूने ट्रेन केलंय. तर आपल्याकडे १५ हजार हाय एंड जीपीयू आहेत. भारताकडे भक्कम अशी कंप्युट फॅसिलीटी आहे.

कोणत्याही लँग्वेज मॉडेलला ट्रेन करण्यासाठी हाय एंड जीपीयूची गरज असते. जीपीयू म्हणजेच ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. याचा वापर लार्ज लँग्वेज मॉडेलला ट्रेन करण्यासाठी केला जातो. ग्राफिक्स कार्ड विशेष पद्धतीने तयार केली जातात ज्यामुळे त्याचा वापर एआयसाठी केला जातो. नॉर्मल जीपीयूनेसुद्धा हे काम होऊ शकतो पण त्यासाठी लागणारा वेळ जास्त असतो.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

सरकारने १८ हजार जीपीयूची कंप्युट फॅसिलीटी तयार केलीय. ही सुविधा स्टार्टअप्स, रिसर्चर्स आणि डेव्हलपर्ससाठी लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. इंडिया एआय मिशन अंतर्गत टेक्नॉलॉजीशिवाय इतर सेक्टरमध्येही एआय वापरले जाईल. यात आऱोग्य, शिक्षण, शेती आणि हवामान यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात इंडिया एआय मोहिमेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. जवळपास १० हजार कोटींच्या एआय मोहिमेंतर्गत भारतात एआय कंम्प्युटिंग इकोसिस्टिम तयार करण्यापासून ते एआय स्टार्टअप्सला प्रोत्साहन दिलं जात आहे.