राज ठाकरे संभाव्य आचारसंहिता भाकरी फिरवणार?; जाणून घ्या पक्षात होणारे मोठे बदल

0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी करत जोरदार भाषण दिले. राज ठाकरेंनी महाराष्ट्रात झालेल्या निवडणुका, महायुतीला मिळालेले मतदान, पिढीची झालेली चौकशी अशा विविध गोष्टींवर आपले मत मांडले. याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये शिस्त लावण्याविषयी देखील राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. पक्षाला शिस्तीची गरज असल्याचे यावेळी राज ठाकरेंनी आवर्जून म्हटले.

मी अनेक पराभव आणि विजय पाहिलेत. पराभवाने खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही. खचलेले आणि पिचलेले अशा लोकांचं नेतृत्व मला करायचं नाही. माझ्यासोबत रहायचं तर ठाम रहा. आपल्याला जे महाराष्ट्रात करायचंय, मराठी माणसासाठी करायचं ते आपण करणारच आहोत आणि ते आपलं स्वप्न आहे. आज ना उद्या, ते होणार म्हणजे होणारच.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, पक्षाला शिस्त आणण्यासाठी आचारसंहिता येणार आहे. जे मी विभाग अध्यक्षाला बोलेन, ते शाखा अध्यक्षाला आणि मनसेच्या कार्यकर्त्यालाही कळलं पाहिजे, नेत्यांची आचारसंहिता नेत्यांना लागू असेल. काही पदांची नावे बदलली जातील. ते हळू हळू टप्प्याटप्प्याने मांडेन.

याच बरोबर राज ठाकरेंनी एके दिवशी मी कुठेतरी जात होतो. तेव्हा चंद्रकांत पाटील भेटले. मुंबईत आल्यावर चहा प्यायला येतो म्हणाले. तर मी असं सांगू का की काय गरज आहे चहा प्यायला यायची असं म्हणायचं का?

नंतर चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले. मला अजूनपर्यंत कळलं नाही ते बाहेर पडल्यावर नेमकं काय म्हणाले. पत्रकारांनी विचारलं पाटीलसाहेब काय चर्चा झाली. त्यांनी दंड दाखवला. मला त्याचा अर्थच कळलं नाही. बाई आणि बुवा एकत्र भेटले की लफडंच असलं पाहिजे, दुसरं काही असू शकत नाही का?

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

खर्च करू नका

प्पा मारू शकतात, भेटू शकतात…महापालिकेच्या निवडणुका अजून पुढे जातील. ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील. त्यामुळे आताच काही खर्च करू नका, देवदर्शनाला लोकांना नेत बसू नका. आताच खिसे मोकळे कराल आणि निवडणुकीवेळी माझ्याकडे याल खिसे बाहेर काढून.