‘मला तुम्ही कर्णधार म्हणून….’, रोहित शर्माची BCCI कडे विनंती, म्हणाला ‘त्यानंतर मी कायमचा…’

0

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या बीसीसीआयच्या बैठकीत अजून एक मोठी माहिती समोर आली आहे. या बैठकीला कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेही हजेरी लावली होती. रोहित शर्मानंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण होणार यावर सध्या गंभीर चर्चा सुरु असल्याचं आता जाहीरच झालं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान रोहित शर्मा या बैठकीत बीसीसीआय प्रमुख आणि निवडकर्त्यांना आपल्या अजून काही महिने कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवण्याची विनंती केली आहे. यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

‘दैनिक जागरण’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, रोहित सध्या तरी आपलं कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत नाही. सध्या जसप्रीत बुमराहला कर्णधार करण्याची मागणी आणि तशी तयारी असतानाही रोहित शर्मा मात्र आपल्यालाच कर्णधार म्हणून कायम ठेवावं अशी विनंती करत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या हिटमॅनने बीसीसीआयला या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तो त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू ठेवण्याची शक्यता कमी आहे असं कळवलं आहे. दरम्यान, बोर्डाला कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधारपदासाठी त्याचा उत्तराधिकारी शोधण्यास सांगण्यात आले आहे.

जर सर्व काही योजनेप्रमाणे गेलं, तर चॅम्पिअन्स ट्रॉफी संपल्यानंतर रोहित शर्मा आपल्या निवृत्तीची घोषणा करु शकतो. तथापि, बीसीसीआयचे अधिकारी आणि निवड समिती बुमराहच्या पूर्णवेळ कर्णधारपदाच्या नियुक्तीशी पूर्णपणे सहमत नाहीत. दुखापती टाळण्यासाठी त्याच्या कामाचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणं आवश्यक आहे, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीत बराच काळ अडथळा निर्माण झाला आहे. म्हणूनच, निवड समिती बुमराहला मदत करण्यासाठी सक्षम उप-कर्णधारपदाचे पर्याय शोधण्यास उत्सुक आहेत.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

रिपोर्टनुसार, संघ व्यवस्थापनाला कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार नको आहेत. सूर्यकुमार यादवला एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा विचारही करण्यात आला होता, परंतु सध्या भारताच्या 50 षटकांच्या संघात त्याला स्थान नाही.

जसप्रीत बुमराहला कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात तसा काही अडथळा नाही. मात्र त्याची दुखापत हा चिंतेचा विषय आहे. यामुळे उप-कर्णधारपदासाठी ऋषभ पंत आणि यशस्वी जैसवाल यांचं नाव चर्चेत आहे.