चोरी, दरोडे ते हाफ मर्डर! वाल्मिक कराडचा राईट हँड असणारा गोट्या गित्ते आहे तरी कोण?

0
3

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणामुळे सध्या बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आहे. याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यामुळं मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. अशातच वाल्मिक कराड यांचा राईट हँड म्हणून चर्चेत असणाऱ्या गोट्या गित्तेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, गोट्या गित्ते आहे कोण? त्याची पार्श्वभूमी काय? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

ग्यानबा मारुती गित्ते उर्फ गोट्या हा मुळ परळी तालुक्यातील नंदागौळचा रहिवासी आहे. सध्या गोट्या गित्ते हा बँक कॉलनी परळी येथे राहत आहे. गोट्या गित्तेवर आतापर्यंत अनेक पोलीस ठाण्यात चोरी हाफ मर्डर दरोडे असे गुन्हे दाखल झाले आहेत.

कोणत्या पोलिस स्टेशनमध्ये कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल?

307 IPC परळी शहर पोलीस स्टेशन हाफ मर्डर

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

498 अ IPC पोलीस स्टेशन निलंगा घरगुती

363 364अ पोलीस स्टेशन उदगीर अपहरण

354 34 पोलीस स्टेशन ग्रामीण चोरी प्रकरण

394 439 ग्रामीण पोलीस स्टेशन चोरी

307 IPC ग्रामीण पोलीस स्टेशन हाफ मर्डर

394 34 IPC, परळी ग्रामीण पोलीस स्टेशन चोरी

394 IPC पोलीस स्टेशन केज चोरी

379.34 परळी ग्रामीण पोलीस स्टेशन चोरी

392.34 IPC स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे चोरी

395, IPC किनगाव पोलीस स्टेशन जिल्हा लातूर चोरी

399 IPC चिंचवड पोलीस स्टेशन पुणे चोरी

395 IPC किनगाव पोलीस स्टेशन जिल्हा लातूर चोरी

224 IPC नवा मोंढा लॉक अप मधून पळून जाणे

279.337 IPC पोलीस स्टेशन केज

379 नवा मोंढा परभणी पोलीस स्टेशन

363.364.395 2015 ला दाखल झाला आहे पोलीस स्टेशन माहिती नाही

302 फूड अँड ड्रगचा गुन्हा परळी ग्रामीणला दाखल झाला आहे

गोट्या गित्तेनेच ल्मिक कराडच्या सांगण्यावरुन बापू आंधळेला गोळी मारली, आव्हाडांचा दावा

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एका पोस्टचा दाखला देत गोट्या गित्ते आणि वाल्मिक कराडबाबत एक सनसनाटी दावा केला आहे. गोट्या गित्ते यानेच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन बापू आंधळेला गोळी मारली, असा दावा आव्हाड यांनी केला आहे. त्यासोबत जितेंद्र आव्हाड यांची गोट्या गित्ते याच्या कृष्णकृत्यांचा पाढा वाचणारी सोशल मीडियावरील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गोट्या गित्ते हा बीड जिल्ह्यात सर्रासपणे पिस्तुल विकायचा, असा दावा करण्यात आला आहे. बीडमध्ये प्रत्येकाच्या कमरेला बंदूक असायचे श्रेय गोट्या गित्ते याचे. हा माणूस गेली १० वर्ष पुणे आणि महाराष्ट्रात बंदुका विकत आहे. पूर्ण हाय एन्ड पिस्तूल विकतोय, हा एका आठवड्यात जामिनावर बाहेर येतो, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हा व्हिडीओ वाल्मिक कराड याला पुण्याहून बीडच्या केज येथे नेतानाचा असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पोलिसांच्या गाड्यांच्या ताफ्यासोबत गोट्या गित्ते याची गाडीही असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोट्या गित्ते हा सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जाते.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

विष्णू चाटेला आज केज न्यायालयासमोर उभे केले जाणार

खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला आज केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. विष्णू चाटे याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याची चौकशी करुन व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार आहे. आज केज न्यायालयात हजर केल्यानंतर जो निर्णय न्यायालयाचा येईल त्यानंतर कराडच्या चौकशीला सुरुवात होईल. तर फोनवरील संभाषणाचे व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अवादा एनर्जी प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्याकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडसह विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले याच्यावर गुन्हे दाखल असून ते सीआयडीच्या ताब्यात आहेत. आज केज न्यायालयात विष्णू चाटेला दुसऱ्यांदा हजर केले जाणार आहे.