मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी शरण आला. तब्बल 22 दिवसांनंतर त्याने शरणागती पत्करली. त्याच्या तपासासाठी सीआयडीची नऊ पथके त्याचा शोध घेत होती. पण अखेर वाल्मिक कराड याने शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवले आणि 31 डिसेंबर रोजी त्याने आत्मसमर्पण केले.त्यानंतर रोज मोठे खुलासे होत आहे. राज्यातील विविध शहरात कराडचे बँक खाती, वेगवेगळ्या शहरात मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.






बीड आणि परळी शहरात नाही तर प्रत्येक गल्ली बोळात वाल्मिकची दहशत आहे. वाल्मिक कराड पोलिसांना देखील घाबरत नव्हता. एवढच अनेक आयएएस अधिकारी वाल्मिकच्या घरासमोर दरबार भरवतात, अशी देखील चर्चा आहे. वाल्मिक कराडच्या दहशतीमागे धनंजय मुंडे यांचे राजकीय पाठबळ असल्याच्या चर्चा आहेत. वाल्मिक कराडची दहशत ही आजची नसून अनेक वर्षापासून आहे. या दहशतीतूनच वाल्मिकने खंडणी, अपहरण, हफ्ते अशा अनेक माध्यमातून बक्कळ पैसा कमावला आहे.
वाल्मिकच्या जमिनी कुठं कुठं?
वाल्मिक कराडने हे साम्राज्य गेल्या पाच वर्षात उभे केले आहेत. बीडमध्ये कुठेही विचारलं ही जमीन कोणाची तर ही 45 एकर वाल्मिक अण्णाची दुसरीकडे 50 एकर, बार्शी तालुक्यात 45 एकर, सोनपेठ तालुक्यात एका ठिकाणी 45 ते 50 एकर, सोनपेठ तालुक्यात 20 एकर क्रशर, माजलगाव तालुक्यातील शिरसी पारगाव तिथे 45-50 एकर, मांजरसुंबा गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर 45 एकर जमीन आहे. वाल्मिकच्या जमिनी कुठेकुठे आहे हा संशोधनाचा विषय आहे. पुण्यातील मगरपट्टा सिटी हा अतिशय महागडा आणि अद्यावत सोयी-सुविधायुक्त असा परिसर आहे. तिथे देखील वाल्मिकची प्रॉपर्टी आहे.
पुण्यातील मगरपट्ट्यात प्रशस्त फ्लॅट
वाल्मिकने मगरपट्टा सिटीमध्ये एका मोठ्या इमारतीत पूर्ण फ्लोअर ड्रायव्हरच्या नावावर घेतला आहे. हे पैसे कुठुन आले आहेत. बऱ्याचशा प्रॉपर्टीमध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि वाल्मिक कराडची सयुंक्त नावे असलेल्या अनेक प्रॉपर्टीमध्ये असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
वाल्मिक कराडची तब्बल 100 बँक खाती
वाल्मिक कराडची तब्बल 100 बँक खाती असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले आहे. वाल्मिक कराड याचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. फक्त वाल्मिक कराड नव्हे तर त्याच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
दहा वर्षापासून राष्ट्रवादी पक्षासाठी काम
गेल्या दहा वर्षांपासून वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी पक्षाचे काम करत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून वाल्मिक कराडची ओळख आहे. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळीमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात ते अग्रेसर असतात. परळीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.











