राज्यपालांच्या भेटीनंतर सुरेश धसांचे बदलले सूर; म्हणाले, फडणवीसांकडे जाण्याची लायकी नाही, अजितदादांविषयी दिलगीर…

0

सर्वपक्षीय नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात निवेदन दिले. सरपंच देशमुख यांचे हत्याप्रकरण गंभीर आहे त्यामुळे राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करावा आणि याप्रकरणी लक्ष देऊन कारवाई करावी ही विनंती सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने केली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांना तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे का नाही गेला, त्यांच्या मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत नाही, अशी विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले, फक्त राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांना भेटणार नाही. त्यांना सांगायाची गरज काय त्यांच्याकडे गृह खाते आहे. त्यांच्याकडे सर्व माहिती पोहोचली असेल. आम्हा छोट्या लोकांनी त्यांना सांगायची आवकात नाही. संभाजीराजे त्यांच्याकडे या मागणीसाठी जातील, अशी माहिती आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

आम्ही राज्यपालांना भेटलो. या प्रकरणात जोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदावर राहू नये किंवा चार्जशिट दाखल होईपर्यंत त्यांना बिनखात्याचे मंत्री करावे, अशी मागणी आहे. अजितदादांविषयी केलेल्या वक्तव्याविषयी देखील सुरेश धस यांनी माफी मागितली.

ते म्हणाले, अजितदादांबरोबर मी खुप काळ काम केले आहे. एक नैतिक अधिकार म्हणून त्यांच्या विषयी अरे तुरेचा शब्द जायला नको होता जर गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. दादांना त्याचा राग येणार नाही कारण अजितदादांसाठी मी डोक्यात दगडं खालली आहेत. त्या अधिकार वाणीने माझ्याकडून तेवढा शब्द गेला. गेला असला तरी तो माझा मी परत घेतो.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

नो मराठा नो वंजारी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा वंजारी असे रुप दिले जात असल्याचा प्रश्न पत्रकारांनी धस यांना विचारला. ते म्हणाले, नो मराठा वंजारा वंजारी. वंजारी समाजाच्या 90 टक्के लोकांना हत्या प्रकरण पटलेले नाही. वाल्मिक अण्णा कराड आणि धनंजय मुंडे यांच्या गँग ऑफ वासेपुरचा त्रास कारखान्यातील मुकादमांनाही झाला आहे.