छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल येथे सकल मराठा मेळावा: समाजातील समविचारी लोकांमध्ये रमले चंद्रकांत मोकाटे

0

मराठा समाज विकास संघटनेतर्फे शनिवार, दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता शुक्रवार पेठेत सुभाष नगर जवळ छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल येथे सकल मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती संघटनेचे समन्व्यक श्री बाळासाहेब अमराळे, रविंद्र माळवदकर, विराज तावरे, तुषार काकडे, अजय पाटील, युवराज डिसले, प्राची दुधाने यांनी गुरुवारी नवी पेठेतील पत्रकार भवन, येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली.

या मेळाव्यात मराठा आरक्षणविषयीं निर्णय प्रलंबित आहे. त्याविषयी भूमिका घेणे. सारथी संस्थेच्या कामांसाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा यू पी एस सी व एम पी एस सीच्या विध्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्यात.मराठा समाजाच्या मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत.मुंबईत अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व पुतळा उभारण्याची योजना प्रलंबित आहे ही योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व समाजाची जनगणना करण्यात यावी.

अधिक वाचा  बळीराजाचा आयुष्य चिंतेच अन् दादा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात लावणी…. महिलेचे ठुमके…. मस्त चाललय तुमचं!

मराठा समाजातील विध्यार्थ्यांसाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधावे. आदी मागण्या विषयी चर्चा करण्यात येणार आहे. या मेळाव्यास पुणे जिल्ह्यातील मराठा समाजातील समविचारी शैक्षणिक क्षेत्रातील, सामाजिक, संस्थामधील कार्यकर्ते, गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.