भोर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी घराणेशाहीच्या वळचणीला बसलेल्या चांडाळ चौकडीने महायुतीमार्फत भोर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली. अन् महायुतीतील तीनही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (महायुती विचाराच्या विरोधातील उबाठा) उमेदवार आयात करत शंकर मांडेकर यांना उमेदवारी दिली असली तरी सुद्धा स्थानिक पातळीवरती जनतेच्या मनात एक नव नेतृत्व उदयास येत असून प्रचार यात्रेच्या दरम्यान या उमेदवाराला मिळणारा प्रचंड उत्साह पाहता मुळशी तालुक्यामध्ये हिंदुत्ववादी चेहरा म्हणून आणि कायम जनसेवेत आयुष्यात केलेल्या किरण दगडे पाटील यांच्या पाठीमागे तालुक्यातील मतदार उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘राष्ट्रवादी’ने विकासवादी जनतेची दिशाभूल करत डमी उमेदवार दिल्याची चर्चा अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे स्पष्ट होत आहे. मुळशीतील जनतेत अनेक विधायक कामांमुळे जनतेच्या घरा घरात पोहोचलेले किरण दगडे पाटील यांनाच महायुतीकडून उमेदवारी निश्चित असताना फक्त घराणेशाहीनिष्ठ ‘चांडाळ चौकडीच्या करामती’मुळे किरण दगडे पाटील यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा लागला जात असला तरी सुद्धा घराघरांमध्ये होणारे स्वागत आणि नागरिकांचा उत्साही प्रतिसाद यामुळे मुळशी तालुक्यातून अचानकपणे किरण दगडे पाटील रिंगणात आले असून भोर विधानसभा मतदारसंघात किरण दगडे पाटील यांचे भगवं वादळ पिवळ्या रंगांमध्ये रंगत आहे.
रविवारी (दि. १० नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद दस्तुरखुद्द अजित पवार यांना देखील खटकल्याने जास्त वेळ भाषण न करता नाराज होऊन काढता पाय घ्यावा लागला. आणि त्यानंतर संपूर्ण मतदारसंघांमध्ये शंकर मांडेकर हे डमी उमेदवार असून दोन पिढ्यांच्या घराणेशाहीचा विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचा हिंदुत्ववादी चेहराच पराभव करू शकतो याची जाणीव मुळशीच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना व नागरिकांना झाली असून किरण दगडे पाटील हे अपक्ष जरी उभे असले तरी त्यांच्याच पाठीमागे ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याची जाणीव प्रचारास मिळणाऱ्या प्रतिसादातून मिळत आहे. मुळशीत सध्या पिवळं वादळ घोंगावतंय आणि तगड्या लढतीसाठी किरण दगडेच वरचढ ठरणार असल्याची चर्चा चौकाचौकात रंगू लागले आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांनी शिवछत्रपतींचा भगवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निळा आणि विचाराची बांधिलकी असलेल्या पिवळ्या रंगावर निवडणूक चिन्ह घेत अनोखी रचना केली आहे.












