वडगाव-धायरीत महायुती एकजुटीतूने जनता समर्पित आमदार तापकिरांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार

0

महायुतीच्या नेतृत्वाखाली आज वडगाव-धायरी परिसरात गाव भेट दौरा व पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही पदयात्रा दुपारी २ वाजता संपन्न झाली. मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने आयोजित या दौऱ्यात महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. यावेळी महिला आयोग अध्यक्ष: रूपालीताई चाकणकर, शिवसेना पुणे शहर प्रमुख: पूजाताई रावेतकर, मा. नगरसेवक: राजाभाऊ लायगुडे, बाळासाहेब नवले, राजश्रीताई नवले, हरिदास चरवड, स्वीकृत नगरसेवक: गंगाधर भडावळे, प्रमुख पदाधिकारी: अतुल चाकणकर, अनंता दांगट, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष: सारंग नवले, महिला अध्यक्ष (राष्ट्रवादी अजितदादा गट): डांगीताई, प्रभाग अध्यक्ष: यशवंत लायगुडे, यासोबतच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धायरी मुख्य रोडवरून सुरू झालेली ही पदयात्रा उंबऱ्या गणपती चौक, मुक्ताई गार्डन कमान, गणेशनगर मित्र मंडळ, रायकरनगर, गारमाळ, लाडली साडी सेंटर कॉर्नर, मिडीया कॉर्नर, आणि शेवटी सुवासिनी मंगल कार्यालय (त्रिमूर्ती हॉस्पिटल) येथे संपन्न झाली.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

पदयात्रेदरम्यान आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. मागील काळामध्ये महायुती सरकारच्या मार्फत करण्यात आलेल्या विकासकामांबाबत स्थानिकांचा अभिप्राय जाणून घेतल्याने जनतेत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. वडगाव धायरी भागामध्ये ही पदयात्रा केवळ प्रचाराचाच भाग नसून मतदारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणार्थ सातत्याने कार्यरत राहण्याची वचनबद्धता असल्याचे यावेळी उमेदवार भीमराव तापकीर यांनी सांगितले.

वडगाव-धायरीसारख्या भागाचा सर्वांगीण विकास आणि स्थानिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचा निर्धार महायुतीच्या नेतृत्वाने यावेळी व्यक्त केला. महायुतीतील सर्व घटक पक्षांकडून तापकीर यांच्या नेतृत्वात वडगाव-धायरीच्या जनतेसाठी सतत कार्यरत राहण्याचे वचन पुन्हा एकदा दृढ करण्यात आले.

अधिक वाचा  @भाजपा पर्मनंट कार्यकर्ता!; सत्ता भाजपाची, तरी दारुण पराभव का?; निष्ठावान कार्यकर्त्यांची पुण्यात खदखद व्हायरल