माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या कोथरूड गावठाण परिसरात पदयात्रेचे उत्साहात स्वागत

0

महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी त्यांच्या आमदारकी व नगरसेवकपदाच्या काळात चांगली विकासकामे कोथरूड विधानसभा मतदारंसंघाचा विकास केला. त्यानंतरच्या 10 वर्षाच्या काळात विकासकामांचा वेग मंदावला. असे मत पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख श्री गजानन थरकुडे यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी शनिवारी कोथरूड गावठाण, भुजबळ वस्ती, भूमकर आळी, खालची व वरची आळी कांबळे वस्ती एकता कॉलनी, आदी परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी संपर्क साधला या परिसरातील नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

श्री थरकुडे म्हणाले की, मोकाटे सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर विकासकामे केली ते या भागातील रहिवासी आहेत त्यामुळे या परिसरातील नागरिकांना जाणवणाऱ्या समस्याची माजी आमदार मोकाटे यांना जाणीव होती. थरकुडे पुढे म्हणाले की मोकाटे कर्वेनगर वारजे कोथरूड परिसरात होणारी वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी कॅनॉलवर रस्ते बांधले चांदणी चौकातील होणाऱ्या अपघात विषयी आंदोलन केली आणि आवाज उठवला. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते श्री मोकाटेच पुन्हा आमदार व्हावेत म्हणून जोमाने काम करीत आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. आज झालेल्या पदयात्रेत शिवाजी गाढवे, माजी नगरसेविका वैशाली मराठे, चंदू कदम, राजू मराठे, संजय मोकाटे, दत्तोबा वांबीरे, बाळासाहेब खैरे राजेश पासलकर, राजू मगर आदी सहभागी झाले होते

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती