“शरद पवारांना सज्जद नोमानी याने २५ मतदारसंघाची यादी पाठवली”; चित्रा वाघ यांचं खळबळजनक ट्विट

0

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. याचपार्श्वभूमीवर मराठा समाजाला मराठा आरक्षणाचे आमिष दाखवून मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता अशातच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सखल हिंदू समाजाला डोळे उघडून सध्या सुरू असलेले राजकारण उघड्या डोळ्यांनी बघा असे आवाहन आपल्या ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

काय होतं ट्विट

हिंदूंनो, उघडा डोळे बघा नीट ! ‘जनाब’ शरद पवारांना सज्जद नोमानी याने २५ मतदारसंघाची यादी पाठवली आहे. ज्यामध्ये मुस्लिमांच्या १०० टक्के मतदानामुळे ‘मविआ’ चे उमेदवार जिंकणार असे सांगितले आहे. मुस्लिमांचा फतवा निघाला आहे, हिंदूंनो जागे व्हा !, असे ट्वट करत त्यांनी हिंदूंना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

https://x.com/ChitraKWagh/status/1853750170560643080

गेल्या वर्षभरापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी आंदोलन उपोषण करत आहेत. मात्र लोकसभेप्रमाणेच विधानसभेत मतांची गोळाबेरीज करण्याचे काम आता मनोज जरांगे करत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी मनोज जरांगे हे शऱद पवारांचा बोलविता धनी असल्याचा दावा केला होता. मात्र आता ते सत्यात उतरत असल्याची जाणीव होत आहे.

याचे आणखी एक उदाहरण म्हणजे सज्जाद नोमानी आणि मनोज जरांगे पाटील यांची दिवाळीत भे. नोमानी यांनी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि हिंदू धर्माविरोधात अनेकदा गरळ ओकली आहे. आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणारा जनाब शरद पवारांचा चेहरा म्हणून ओळखू जाऊ लागलेला मनोज जरांगे आता मतांची गोळाबेरीज करत असून हिंदूंमध्ये तेढ निर्माण करत आहे. हिंदूंची माथी भडकवण्याचे काम सुरू असल्याचे प्रत्यक्षिक सुरू असल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशातच आता नोमानी यांनी ‘जनाब’ शरद पवारांना २५ मतदारसंघाची यादी पाठवली आहे. ज्यामध्ये मुस्लिमांच्या १०० टक्के मतदानामुळे ‘मविआ’ चे उमेदवार जिंकणार असे सांगितले आहे. मुस्लिमांचा फतवा निघाला असल्याचे ट्विट केल्याने चित्रा वाघ यांनी आता सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता