कोथरूड विधानसभा मतदारसंघ सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष या विधानसभा मतदारसंघावरती विजय मिळवण्याचे मनसुबे आखात असताना भारतीय जनता पक्षाच्या हक्काचा प्रभाग 9. आणि या प्रभागातील काही स्थानिक गणिते आणि मित्र पक्षातील काही मनसुबे बहाद्दर लोकांच्या हालचालीमुळे नाराज असलेल्या तरुण युवा चेहरा अमोल बालवडकर यांनी थेट उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात केलेलं बंड आज अखेर चंद्रकांत दादा यांच्या सस्नेह भेट अन् आस्थेवाईक चौकशी आणि जबाबदारीचा शब्द या त्रिवेणी संगमावरती अमोल बालवडकर या नव युवा नेतृत्वाने एकजुटीने काम करुन चंद्रकांतदादा पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केला.






कोथरूड विधानसभा मतदारसंघातून अमोल बालवडकर यांनी यंदा कोथरूड विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी अन् मोर्चेबांधणीही केली होती. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली परंतु ज्येष्ठ नेत्याला डावलने पक्षाला ही शक्य नसल्याने पहिले यादीमध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर पहिले दोन दिवस निर्णयासाठी थांबत अमोल बालवडकर यांना असंख्य पक्षांच्या ‘ऑफर्स’ही आल्या होत्या. त्यानंतर काही निवडक लोकांनी हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला खिळखिळा करण्यासाठी आमिष दाखवत अमोल बालवडकर यांना निवडणूक लढण्याची तयारी करण्यास भाग पाडले. नवनेतृत्व राजकारणातील खाचखळगे अन गालीच्याच्या खालील काटेरी धोके याचीपूर्ती जाण नसल्याने हे नव नेतृत्व वेगळ्या वाटेवर जाण्याची शक्यता निर्माण झाली त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा धोका ओळखत यातून मार्ग काढण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांना लक्ष्य घालण्यास सांगितले. मुळातच उदारमतवादी सामंजस्य प्रेमी आणि स्नेहजीवी चंद्रकांत दादा यांनी मग कोणताही विचार न करता थेट पुत्रवत असलेल्या अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेवाईक चौकशी केली अन जबाबदारीचा शब्द देत या नव तरुणाला खरा धोका काय आहे याची जाणीव करून दिली. त्यानंतर सर्वांनी एकजुटीने काम करुन चंद्रकांतदादा पाटील यांना विजयी करायचे आहे, असा निर्धार यावेळी अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला.
यावेळी योगीराज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, भाजप कोथरुड उत्तर विभागाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, लहू बालवडकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, राहुल कोकाटे, अनिल बालवडकर, राजेंद्र मुरकुटे, मोरेश्वर बालवडकर, यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.











