कोथरूड विधानसभा सलग तिसरी विजयी मोहर उठवण्यास महायुतीचे हजारों कार्यकर्ते सक्रिय; उत्साही गर्दीचा नवा रेकॉर्ड?

0

चला फॉर्म भरायला! “कमळ” फुलवायला !! असा मेसेज आला आणि समस्त कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये संचारलं…! मायबाप कोथरुडकर जनतेच्या सेवेत असलेल्या चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी जनसमुदाय रस्त्यावर उतरला आणि मिरवणुकीच्या चारी बाजूला चार चार किलोमीटरचे वाहनांच्या रांगा शेकडो नागरिक सहभागी अशा उत्साही गर्दीच्या आशीर्वादात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, हॅट्रिक आमदार भीमराव तापकीर आणि पुणे शहरातील दोन डझन नगरसेवकासह ‘कोथरूड’मध्ये हॅट्रिक विजयाचा संकल्प करत महायुतीचा अधिकृत उमेदवार आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज भरला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी आमदार चंद्रकांत दादा पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य संचारले होतं; कार्यकर्त्यांची पक्की बांधणी आणि जनसंपर्क किती दांडगा असतो याची जाणीव आज उमेदवारी अर्ज भरताना सर्वांनाच झाली. कोणतीही विशेष व्यवस्था नसतानाही शेकडो नागरिक रस्त्यावर उत्साहात सहभागी होत होते. आपलं कोथरूड आपले दादा अशी भावना घेऊन प्रत्येक कार्यकर्ता विजयाचा संकल्प करण्याच्या उद्देशाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या भव्य रॅलीत सहभागी झाले होते.

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये आजवर जे काही केलं त्यासाठी मत मागण्यापेक्षा दुःखाचा एकही उमरा शिल्लक ठेवायचा नाही हा जो माझा संकल्प मी नरेंद्र मोदी यांच्यासमोर केला आहे. ते साध्य करण्यासाठी ही मायबाप जनता विश्वासाने, प्रेमाने मतांच्या आशीर्वादाचा वर्षाव करेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती