प्रशासनराज घनकचरा विभागाची कोटी-कोटीची उड्डाणे; ‘स्वच्छ’ 5 वर्षाचा करार; ही निविदा १०० कोटींनी फुगवली

0

पुणे महानगरपालिकेत सध्या प्रशासन काळ सुरू असल्याने कोणतीही मोठी कामे होत नसताना पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या मार्फत मात्र या नामी संधीचा फायदा घेत करोडोंची निविदा अन आपल्या हेतू साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या संस्थांची करार करण्याचा सपाटा सुरू करण्यात आलेला आहे. पुणे महापालिकेचे प्रशासक काळातील सर्वसाधारण सभा ज्या ‘स्वच्छ’ संस्थेच्या कारभारावर गाजली शहरातील किमान 16/ 17 संस्थांनी हे काम करण्यास अनुकूलता दाखवली होती तरीसुद्धा घनकचरा विभागाच्या वतीने ‘स्वच्छ’ संस्था पाच वर्षासाठी करारबद्ध करण्यात आली आहे.

हे काम शांततेत पार पडल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांचे झाडणकाम यांत्रिकीद्वारे (रोड स्वीपर) करण्यासाठी महापालिकेने पाच वर्षांसाठी ६० कोटी रुपयांची निविदा काढली होती. पण त्यात ठेकेदाराने ३८ ते ८० टक्के जादा दराने निविदा भरल्याने ही निविदा रद्द केली. फेरनिविदा काढताना निविदेची व्याप्ती वाढवून पाच वर्षांऐवजी सात वर्षांची मुदत करण्यात आली.

अन्य तांत्रिक गोष्टींचा समावेश केल्याने हा खर्च १६३ कोटींपर्यंत गेला आहे. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांत निविदा तब्बल १०० कोटींनी फुगविण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याची सफाई होणार की करांच्या रकमेतून पुणेकरांनी भरलेल्या तिजोरीची? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. पूर्वीच्या निविदेत बदल करून निविदेची व्याप्ती वाढविण्यात आली. त्यामध्ये पाचऐवजी सात वर्षांची निविदा काढली. प्रत्येक परिमंडळाचा प्रतिवर्षाचा खर्च पाच कोटी ८३ लाख इतका झाला आहे. यापूर्वी हा वार्षिक खर्च चार कोटी ५१ लाख इतका होता. तसेच ठेकेदाराला त्याच्या गाड्यांचा वापर दोन वर्षे जास्त करता येणार असल्याने गाडीची किंमत वसूल होणार आहे. या फेरनिविदेत पेव्हरमेंट स्वीपरच्या दोन मशिन वाढविण्यात आल्या.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

लीफ ब्लोअरमुळे कचरा धूळ पुढे ढकलली जाईल, प्रत्येक रस्त्याला दोन गाड्या असतील, झाडणकाम करण्यासाठी प्रत्येक रस्त्याला सात कर्मचारी असणार आहेत. एका परिमंडळात कचरा वाहतुकीसाठी पूर्वी एक वाहन (छोटा हत्ती) होते. आता तीन वाहने ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे निविदा फुगली असल्याचे प्रसासकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

महापालिकेने पूर्वनगणननपत्रकात २०.८० कोटी इतका खर्च निश्‍चित केला होता. हे काम इतर शहरात यापेक्षा जास्त दराने केले जाते. महापालिकेचे पूर्वगणनपत्रक चुकले आहे त्यात सुधारणा झाली पाहिजे, असे निदर्शनास आणून देण्यात आले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

त्यामुळे पात्र ठेकेदाराने ३८ ते ४० टक्के जादा दराने निविदा भरली होती. ती रद्द करून फेरनिविदा काढली. त्यात महापालिकेने खर्च थेट दुपटीने वाढवला आहे. त्यामुळे महापालिकेच्या अभियंत्यांचे पूर्वगणनन पत्रक तयार करताना वस्तुस्थिती लक्षात घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच पूर्वीच्या निविदा तीन परिमंडळासाठी होती, पण फेरनिविदेत परिमंडळ १, २, ३, ४ या परिमंडळातील १२ रस्त्यांचा समावेश केला आहे.

प्रतिकिलोमीटर १३३९ रुपये

फेरनिविदेमध्ये १२ रस्त्यांचा समावेश आहे. प्रत्येक रस्त्याची लांबी १० किलोमीटर आहे. स्वीपरने दुभाजकाच्या दोन्ही बाजूंनी व रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पादचारी मार्ग असे चार वेळा म्हणजे एका रात्रीत एका स्वीपरने ४० किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करणे आवश्‍यक आहे. यासाठी प्रतिकिलोमीटर १३३९ इतका खर्च निश्‍चित करण्यात आला आहे. यापूर्वीच्या निविदेत हा खर्च प्रतिकिलोमीटर १०२३ रुपये इतका होता.

नेमके काय झाले?

महापालिकेतर्फे २०१७ पासून शहरातील १२ रस्ते रोड स्वीपरने स्वच्छ करण्यास सुरुवात ठेकेदाराकडून व्यवस्थित काम होत नसल्याने रस्ते स्वच्छ होण्याऐवजी केवळ धूळ उडत असल्याचा अनुभव या निविदेची मुदत संपल्यानंतर महापालिकेने चार महिन्यांपूर्वी निविदा काढली. त्यामध्ये परिमंडळ १, ३ आणि ४ मधील प्रत्येकी ३ रस्त्यांची समावेश यासाठी प्रत्येक परिमंडळासाठी २०.८० कोटी रुपयांचे पूर्वगणनपत्रक मंजूर. यासाठी तीन परिमंडळासाठी ६२ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च येणार होता. प्रत्यक्षात निविदा भरताना पात्र ठेकेदाराने तिन्ही परिमंडळासाठी ३७ टक्के जादा दराने निविदा भरल्याने सुमारे ३० कोटीने खर्च वाढणार होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ही निविदा रद्द करून फेरनिविदेचा निर्णय घेतला.

अधिक वाचा  भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या स्थितीत! राजकीय भूकंपही शक्य? एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा

रोड स्वीपरसाठी इतर शहरांच्या महापालिकांपेक्षा पुणे महापालिकेचा दर कमी होता. त्यामुळे निविदेला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. एका कंपनीने निविदा भरली होती, पण त्यांचा दर खूप जास्त आल्याने निविदा रद्द केली. आता पुन्हा निविदा मागविण्यात आली असून, यामध्ये निविदेची व्याप्ती वाढविल्याने खर्च वाढला आहे. हे काम व्यवस्थित होईल याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाईल.

– पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त

शहरातील प्रमुख रस्त्यांचे झाडणकाम यांत्रिकीकरणाद्वारे (रोड स्वीपर) करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. अवघ्या चार महिन्यांत निविदा तब्बल १०० कोटींनी फुगविण्यात आली आहे.