राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या समर्थनार्थ पुणे शहर कार्यकारणी मध्ये सुरू असलेले राजीनामा सत्र सुरू असताना दीपक मानकर यांच्याकडून पुणे शहरातील कार्यकर्त्यांसाठी एक पत्रक जारी करून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असताना संघटनेच्या मजबुतीकरणासाठी विधानपरिषदेच्या जागेची मागणी दीपक मानकर यांनी केली होती परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या सात जणांच्या यादीमध्ये दीपक मानकर यांचा समावेश नसल्याने पुणे शहर कार्यकारणी प्रचंड रोषात असताना देण्यात आलेले पुणे शहरातील ८५० पेक्षा जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सामूहिक राजीनामे देण्यात आले होते.
पक्षात घडलेल्या घटनांची योग्य दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांनी आज, शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे वेळ देत माझी भेट घेऊन शहराध्यक्ष या नात्याने पुणे शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.
मा. अजितदादा हे पुणे शहर कार्यकारणीच्या कार्यावर अत्यंत समाधानी आहेत. त्यांचे पुण्यातील कार्यकर्त्यांवर विशेष प्रेम असून कोणत्याही पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असे आदरणीय अजितदादांनी ठामपणे जाहीर केले असल्याचे दीपक मानकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
शहरातील सर्वच कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन तयार केलेल्या संघटननाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलं असून बळकटीसाठी आणि पक्षवाढीसाठी योग्य वेळी योग्य न्याय दिला जाईल, या कार्याची योग्य पोचपावती लवकरच दिली जाईल अशी ग्वाही अजितदादांनी यावेळी दिली असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.
पुणे शहर आपला बालेकिल्ला असून कोणत्याही कार्यकर्त्यांनी नाराज न होता येत्या विधानसभेत महायुतीचे जोमाने काम करून आपल्या पक्षाची ताकद दाखवून देऊया, मी आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा शब्द मा. अजितदादानी यावेळी दिला. तरी पक्षाची एकी अशीच ठेऊन आम्ही येत्या विधानसभेला जोमाने सामोरे जाणार असल्याचेही दीपक मानकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. त्यामुळे १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे पक्ष कार्यालय, गुप्ते मंगल कार्यालय, नारायण पेठ येथे होणारी बैठक रद्द करण्यात येत आहे. विधासभा मतदारसंघ नियोजनासाठी लवकरच पुढच्या बैठकीचा तपशील जाहीर केला जाईल.