चाकणकरांना पुन्हा महिला आयोग ‘खडकवासला’ सेफ?; सलग चौथ्या विजयात आत्ता अडसर फक्तं बंडखोरीच?

0

महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप जरी निश्चित झालं नसलं तरी घटक पक्ष ‘सुरक्षित’ मतदारसंघांवर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहेत. विधानसभा निवडणुक घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रातलं वातावरणच राजकीय होऊन गेलं आहे. 288 मतदारसंघासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे यात शहरी, ग्रामीण आणि निमशहरी अशा तीन भागांत विभागला गेलेला खडकवासला मतदारसंघात भाजपनं चाकणकरांना पुन्हा महिला आयोग देत एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं दिसून येत आहे. खडकवासला मतदारसंघात आजपर्यंत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच अटीतटीची आणि थेट लढत झालेली आहे. हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असला तरी त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा कडून जोरदार मागणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनीच पुणे जिल्ह्यातील या सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघातील सलग चौथा विजय साजरा करण्यासाठी आटणी केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खडकवासला मतदारसंघातून लढण्याचा इरादा बोलून दाखवला होता. त्यामुळे भाजपच्या गोटात काहीसे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीला दावेदारी सोडावी लागणार…

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला समजला जात असलेल्या खडकवासल्यातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नव्हते. तेव्हाच मतदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी भाजपची मैत्री नाकारल्याची चर्चा सुरू झाली होती.

मात्र,त्यानंतरही विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपला आपला पारंपरिक खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी सोडावा लागण्याची शक्यता होती. पण आता चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला खडकवासला मतदारसंघावरची दावेदारी सोडावी लागणार आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

खडकवासल्यात प्रतिस्पर्धी कोण असणार..?

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जवळपास 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे.त्यात सचिन दोडके, काका चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

तर दुसरीकडे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश बापू कोंडे हेही पुन्हा खडकवासला मतदारसंघातून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता.मात्र, ऐनवेळी माघार घेतली होती.

चौथ्यांदा विजयासाठी तापकीरांची तयारी सुरू…

दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी 2009 मध्ये खडकवासला मतदारसंघात विजय मिळवला होता. मात्र, 2011 मध्ये त्यांच्या निधनानंतर च्या पोटनिवडणुकीत भाजपने नगरसेवक असलेल्या भीमराव तापकीर यांना संधी दिली. सहानुभूतीची लाट असूनही वांजळे यांच्या पत्नी हर्षदाताई वांजळे यांचा 3 हजार 625 मतांनी पराभव केला. तेव्हापासून या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व वाढतच आहे. 2011 नंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत तापकीर यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली. त्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला बारामती लोकसभा मतदारसंघात ‘मताधिक्य’ देणारा एकमेव मतदार संघ सुद्धा खडकवासलाच आहे. त्यामुळे प्रसंगी कितीही विरोधात (संविधान बदलाची चर्चा, शरद पवार यांची सहानुभूती अन वेगळ्या विचारसरणीचा उमेदवार) स्थिती असतानाही मतदार संघात ‘मताधिक्य’ राखण्यात तापकीर यांना आलेले यश त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यास उपयोगी पडते? हे पाहावं लागेल. आता चौथ्यांदा हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी कसून तयारी केली आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याला प्राधान्य हे सूत्रही खडकवासल्यात भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा