महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज होणार घोषणा, थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद

0

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. अखेर आज (15 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी ही पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  बळीराजाचा आयुष्य चिंतेच अन् दादा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात लावणी…. महिलेचे ठुमके…. मस्त चाललय तुमचं!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद पार पडत असल्याने सर्वांचेच लक्ष त्याकडे लागले आहे. महाराष्ट्रातील निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात सुरु आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष दिल्लीकडे लागले आहे.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधीपर्यंत?
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. पण यंदा हरियाणा विधानसभेची निवडणुकांची घोषणा आधी झाली.

अधिक वाचा  महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दुर्देवी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

कोणत्या राज्यात किती जागा?
महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.