बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटरमागील रहस्य काय? संजय राऊत यांचा रोख कोणाकडे?

0

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाले. या चकमकीचे श्रेय घेण्यासाठी सरकारमध्ये चढाओढ सुरु आहे. परंतु त्या ठिकाणी झालेले एन्काऊंटर कोणातरी वाचवायचे आहे म्हणून झाले आहे. त्या शाळेतील पदाधिकारी चाईल्ड ट्रफिकिंगच्या प्रकरणाशी संबंधित आहे. तो पदाधिकारी भाजप आणि संघाशी संबंधित आहे. त्याला वाचवण्यासाठी हे एन्काऊंटर झाले आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्यात आला आहे. आता उच्च न्यायालयात त्याचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे. या बलात्काराचे रहस्य कोर्टात समोर आले आहे, असे शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  दहशतवादी संघटनेच्या संपर्कातील सोलापूरचा संगणक अभियंता गजाआड; एटीएसची पुणे स्टेशनवर मोठी कारवाई

फडणवीस यांच्या मतदार संघात अत्याचाराच्या अनेक घटना
एका सरकारमध्ये दोने नेते एन्काऊंटरचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करत आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघात १०० पेक्षा जास्त महिलांवर अत्याचार झाला आहे. मग त्यांनी किती लोकांचे एन्काऊंटर केले आहे. गुरुवारी नालासोपारामध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याने महिलेवर अत्याचार केला आहे. आता त्याचे एन्काऊंटर करणार आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

बॅनर्सवरुन केला हल्ला
एन्काऊंटर प्रकरणानंतर ठिकठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स झळकले आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी या दोन्ही नेत्यांना घेरले. ते म्हणाले, ही लोक स्वत:ला सिंघम समजत आहेत. तसे त्यांचे बॅनर लागले आहे. परंतु ती पडद्यावरील कथा जीवनात घडत नाही.

अधिक वाचा  एरंडवण्यात दिवाळीनिमित्त आपुलकीचे नाते दृढ करणारा भाऊबीजेचा सण; चंद्रकांतदादांच महिला भगिनींतर्फे औक्षण

देवेंद्र फडणवीस यांच्या हातात बंदूक दाखवली आहे, काही लोक म्हणतात ते सिंघम. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या हातात रायफल दाखवली आहे, त्यांचेही लोक त्यांना सिंघम म्हणत आहेत. या राज्यात गेल्या काही वर्षांत असंख्य महिलांवर अत्याचार झाले आहेत. किती अत्याचार करणाऱ्या लोकांचे एन्काऊंटर आपण केले अन् करणार आहात? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.