लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पक्षांकडून मतदार संघाची चाचपणी सुरू आहे, बैठकांचा धडाकाही लावला जात आहे. त्यात विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी मोठं विधान केले आहे. देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत जायचंय, महाराष्ट्रात त्यांचा काही रस राहिला नाही, असं मोठं विधान शरद पवारांनी केले आहे. पवारांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
लेट्सअपने शरद पवार यांची मुलाखत घेतली आहेत. या मुलाखतीत देवेंद्र फडवणवीसांवर बोलत असताना शरद पवारांनी खळबळ उडवून टाकणारं विधान केले आहे. ‘देवेंद्र फडणवीसांचा सुरुवातीचा काळ चांगला वाटायचा, त्यांच्यात पोटेन्शिअल आहे असं जाणवायचं. पण आता मला त्यांची धावपळ पुर्णपणे वेगळी वाटते’, असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच देवेंद्र फडवणीस यांचे वडील गंगाधर फडणवीस माझे मित्र होते. आम्ही दोघेही विधान परिषदेत होतो. अतिशय मस्त माणुस अगदी दिलखुलास होता, असे देखील पवारांनी सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांचा हल्लीचा दृष्टीकोण मला फारसा वेगळा दिसतो. मला असं वाटतं त्यांचा इथल्या प्रशासनात आणि राज्यात (महाराष्ट्राच्या राजकारणात) रस राहिलेले नाहीये. त्यांना कदाचित दिल्लीला जायचं असेल केंद्रात जायचं असेल, पक्षाची कामासाठी जायचं असेल, असं खळबळजनक विधान शरद पवारांनी केली आहे.
मुख्यमंत्री पदावर कायम केल्यानंतर जर समजा तुम्हाला ते पद मिळत नसेल तर गाईड करा, मदत करा,नव्या सभासदांसमोर नवीन दृष्टीकोन ठेवा. पण तुम्हाला अन्य पदावर जायची वेळ आली. तर सत्ता मिळते ना मग जातो. काय यातून प्रतिष्ठा राहत नाही, असा हल्ला देखील शरद पवारांनी फडणवीसांवर चढवला.
शरद पवारांचा राजकीय काळ संपला होता, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. यावर पवारांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस जेव्हा असं म्हणाले होते, तेव्हा आम्ही सरकार बदलून दाखवलं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कुणी सरकार बनविले. आम्ही लोकांनीच बनवले होते. त्यामुळे काळ कुणाचा संपला होता, हे त्यांना कळलंच असेल, असा टोला देखील पवारांनी फडणवीसांना लगावला.