मंदार कवाडे यांच्या “भावनांचे मोहर” व “जीवन प्रवाह” या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई: दांडगुरी बौद्धजन सामाजिक विकास मंडळाचे प्रमुख सल्लागार, बौद्धजन पंचायत समिती दिवेटप्पा विभागाचे जेष्ठ कार्यकर्ते, सम्यक कोकण कला संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मंदार कवाडे यांच्या “भावनांचे मोहर” व “जीवन प्रवाह” या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा बौद्धजन पंचायत समितीचे सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते बौद्धजन पंचायत समिती दिवेटप्पा शाखेचे अध्यक्ष श्रीपाल कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली मंदार कवाडे यांच्या ६१ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून बुधवार, दि. २६ जून २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, गोकुळ पास्ता लेन, दादर (पूर्व), मुंबई-१३ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बहुजन हितवर्धक कला संस्थेचे अध्यक्ष संतोष गमरे यांनी अत्यंत लाघवी शैलीने करून उपस्थितांची मने जिंकून घेतली, सर्वप्रथम सम्यक कोकण कला संस्थेच्या कवी कवियत्रींच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांस पुष्पहार अर्पण करण्यात आले तर ज्योत प्रज्वलन सुप्रसिद्ध गायिका कोकणकन्या मीनाक्षी ताई थोरात व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले, नंतर मंदार कवाडे यांचे चिरंजीव, पुतणे, सुना, मुली व जावई अश्या उभयतांच्या जोडीने उपस्थित पाहुण्यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले नाविन्यपूर्ण असा हा स्वागत समारंभ लक्षवेधी ठरला, सदर प्रसंगी राहुल कवाडे यांनी प्रास्ताविक सादर करीत असताना मंदार कवाडे यांचा जीवनपट त्यांनी मांडून त्यांचं खडतर आयुष्य बालपण, शालेय जीवन, तारुण्य ते कबड्डीचे मैदान ते आजवरच्या आयुष्याचे अनेक पैलू उजागर केले, तद्नंतर सम्यक कोकण कला संस्थेच्या प्रबोधनात्मक गीत गायनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

मंदार कवाडे यांच्या पुस्तकांचे उद्घाटन करीत असताना सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी पुस्तकातील एका विद्रोही कवितेचे वाचन करीत, मंदार कवाडे यांचे लिखाण समाजाला दिशा देणारे लिखाण आहे असे प्रतिपादन करीत मंदार कवाडे यांचे कोडकौतुक केले. सदर प्रसंगी पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे राष्ट्रपाल सावंत, डॉ. संजय खैरे, श्रीकांत तळवटकर, नरेश मांडलेकर, संध्याताई गायकवाड, रमाकांत जाधव, अशोक कवाडे, विनायक जाधव, भगवान साळवी, प्रा. संतोष खरे, मारुती सकपाळ, विष्णू शिंदे, संजय मोरे, दीपक मांडलेकर, मनोहर देठे, नाथा जाधव, मुकुंद तांबे, विनोद धोत्रे, राजाभाऊ गमरे, चिंतामण जाधव, सुरेश मर्चंडे, संगम कासारे, नरेश शिंदे, पुस्तक DTP करणाऱ्या हर्षा नरेश शिंदे, सम्यक कोकण कला संस्थेचे आजी माजी कार्यकर्ते, दांडगुरी बौद्धजन सामाजिक विकास मंडळाचे आजी माजी कार्यकर्ते, बौद्धजन पंचायत समितीचे आजी माजी कार्यकर्ते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती त्यांनी ही शुभेच्छापर आपले विचार व्यक्त करीत मंदार कवाडे यांना पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  नेत्यांची प्रसारमाध्यमांत महायुतीची हाक आणि मेळाव्यात ‘एकला चलो’चा नारा भूमिका स्पष्ट नसल्याने इच्छुकांची मोठी अडचण?

सरतेशेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व बौद्धजन पंचायत समितीचे दिवेटप्पा विभागाचे अध्यक्ष श्रीपाल बा. कवाडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून मंदार कवाडे यांना दोन्ही पुस्तक प्रकाशनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता केली.