पुणे ड्रग्स पार्टी, इव्हेंट मॅनेजरची नियुक्ती, बंद झालेला पब पुन्हा रात्री दीडला उघडला

0

पुणे शहरातील ड्रग्स प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच गाजत आहे. ड्रग्स तस्कर अन् येरवडा कारागृहातील ललित पाटील हा ससून रुग्णालयात राहून ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्यानंतर पब आणि ड्रग्स पार्ट्याचे प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. आता दोन दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील पबमध्ये अल्पवयीन मुले ड्रग्स घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या प्रकरणानंतर खळबळ माजली. विरोधकांनी पुणे पोलीस आणि सरकारवर हल्ला चढवला. आता या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या पार्टीसाठी इव्हेंट मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच रात्री दीड वाजता बंद झालेला पब पुन्हा पार्टीसाठी उघडण्यात आला होता.

ड्रग्ज पार्टीत गॅरेजचालक, चायनीज गाडीवाले

पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात पोलीस चौकशीत नवी माहिती समोर आली आहे. त्या ड्रग्ज पार्टीत गॅरेजचालक, चायनीज गाडीवाले सहभागी झाले होते. पुण्यात इव्हेंट मॅनेजरच्या माध्यमातून पार्टी ठरली होती. पुण्यातील लिक्विड लेझर लाउंज हॉटेलमध्ये रविवारी मध्यरात्री दीड ते पाच वाजेपर्यंत ४० ते ५० जणांच्या एका टोळक्याने ड्रग्स पार्टी केली होती. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केल्यावर पार्टीत सहभागी झालेले गॅरेजचालक, चायनीज सेंटर चालक, खासगी कंपनीत काम करणारे नोकरदार यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

इव्हेंट मॅनेजरच्या माध्यमातून पार्टी

इव्हेंट मॅनेजरच्या माध्यमातून ठरलेल्या या पार्टी ठरली होती. पार्टीत सहभागी झालेल्यांची कोणतीही ओळखपत्रे पहिली नाही. त्यांच्या वयाची तपासणी झाली नाही. त्यांचे मद्यसेवनाचे परवाने न पाहताच त्यांना मद्यपुरवठा केल्याची बाब देखील उघड झाली आहे. या टोळक्याने साडेतीन तासांच्या पार्टीत रोख आणि ऑनलाइन स्वरूपात ८० ते ८५ हजार खर्च केले.

त्या लोकांची नेहमीच होते पार्टी

पार्टीत सहभागी तरुण पुण्यातील विविध भागातील रहिवासी आहे. ते वेगवेगळ्या बार, पबमध्ये रात्रीच्या वेळी पार्टीत भेटत असतात. सुरुवातीला त्यांनी हडपसर परिसरातील क्लर्ट या हॉटेलमध्ये रात्री एक ते दीड वाजेपर्यंत पार्टी केली. त्याची रात्रपाळीवरील पोलिसांनी नोंद देखील केली. पण इव्हेंट मॅनेजर अक्षय कामठे, डीजेचालक दिनेश मानकर यांनी पबचालकांना फोन करून एका समूहाला नाइट पार्टी करायची आहे, ते पैसे देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानुसार, बंद झालेला पब पुन्हा दीडला उघडला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

सर्वांच्या चौकशीला सुरुवात

पार्टीमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्या रात्री ज्यांनी, ज्यांनी पार्टीमध्ये सहभाग घेतला, त्या सर्वांच्या चौकशीला सुरवात झाली आहे. पार्टीचे आयोजन करणाऱ्या अक्षय कामठे याला पार्टीसाठी पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आले होते. आता या सर्वांचा जबाब पुणे पोलीस नोंदवणार आहे. त्यांच्या जबाबातून अनेक गोष्टीचे खुलासे होणार आहे.

l 3 बारवर कारवाईचा व्हिडिओ समोर

राज्य उत्पादन शुल्क विभागाने l3 बारवर केलेल्या कारवाईचा व्हिडिओ समोर आला आहे. मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधित हॉटेल सील करत परवाना करण्यात आला आहे. तसेच 241 लिटर विदेशी मद्य राज्य उत्पादन विभागाकडून जप्त करण्यात आले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार