पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. या तिघांनाही पोलिसांनी आधीच अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या तिघांना ब्लड सँपल बदलण्यासाठी विशाल अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त आणखी कुणी फोन केले होते? रक्कम किती ठरली होती? हातात किती रक्कम मिळाली होती? याची माहिती पोलीस घेत आहेत.






पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणा दिवसेंदिवस तापू लागलं असून याप्रकरणी आता आणखी एक नवे अपडेट समोर आले आहे. या अपघाताला जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याचे ब्लड सँपल बदलण्यात आलं होतं, त्यामुळे एकच गदारोळ माजला. खुद्द पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीपुणे पोर्श अपघात प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या अपघात प्रकरणात ब्लड सँपल बदलल्या प्रकरणी अखेर दोन डॉक्टर आणि एका वॉर्डबॉयला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तिघांनाही निलंबित करण्यात आले आहे. हा धक्कादायक खुलासा केला होता. आता या प्रकरणातील तिनही आरोपींचे निलंबन झाल्याचे खुद्द ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी जाहीर केलं. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे या तिघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयनी आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचे समोर आल्यानंतर काल याप्रकरणी चौकशी समितीने कडून तपास करण्यात आला होता. त्यानंतर आज हा निर्णय जाहीर केला.
ससूनचे डीन काय म्हणाले ?
डॉ. अजय तावरे यांच्याकडे असणार कार्यभार आम्ही काढून घेतला आहे. तर डॉ. श्रीहरी हळनोर यांना बडतर्फ केले आहे. ससून रुग्णालयासाठी ही बाब अत्यंत वाईट आहे. अशा पद्धतीने ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करणे चुकीचे आहे. यासंदर्भात पोलिसांनी जी माहिती मागितली आहे ती त्यांना देण्यात आली आहे. माझ्याकडूनही विभागीय आयुक्त आणि आमच्या वरिष्ठांनी माहिती मागितली आहे, असे ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी नमूद केले.











